मम्मीच्या तीन मैत्रिणी आम्हाला…; विधवा महिला बॉयफ्रेंडसोबत पळाली, मुलाने फोडलं आईचं घाणेरडं गुपित
आपल्या जोडीदाराचं, पतीचं निधन झाल्यावर कोणी इतकं क्रूर होऊ शकतं का की आपल्या पोटच्या मुलांनाच सोडून देईल.. तेही कोणत्यातरी परपुरुषासाठी. एवढंच नव्हे तर नंतर आपल्याचा मुलांना मारण्याची धमकीही देईल.. आणप असा विचारही करू शकत नाही, पण प्रत्यक्षात तसं घडलं आहे. ही कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

सर, आम्हाला वाचवा सर. आमचे बाबातर आता या जगात नाहीत आणि आमची आई, ती तर आता दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेलीये. तिच्या तीन मैत्रिणी आम्हाला… फक्त एवढंच कसंबसं बोलून 17 वर्षांचा मनीष वर्मा हमसून-हमसून रडू लागला. तो मुलगा रडताना पाहून पोलिसांनी त्याला कसंबसं शांत केलं, आणि मग त्याची विचारपूस केली. मनीष जेव्हा त्याच्या विधवा आईची संपूर्ण कहाणी सांगितली, ते ऐकून पोलिसही हादरले, सुन्नच झाले. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या सहारणपूर येथील आहे.
मनीषने सांगितलं – मी आणि माझा भाऊ गंगोह गावात राहतो. आजारपणामुळे आमच्या वडिलांचा मृत्यू झाला . गेल्या 2 वर्षांपासून माझ्या आईचं मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या अनुज भाटीशी प्रेमप्रकरण सुरू आहे, माझी आई 42 वर्षांची आहे. ती आता आम्हाला दोघांना एकटं सोडून तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे, एवढंच नाही तर जाताना ती घरातले सगळे दागिने आणि जवळपास साडेतीन लाख रुपयेही घेऊन गेली. आमचं तर आता सगळंच लुटलं गेलंय, खाण्यापिण्याचेही वांदे आहेत आमचे….
पुढे त्या मुलाने सांगितलं – आईचा बॉयफ्रेंड आणि तिच्या तीन मैत्रिणी आता मला आणि माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तो म्हणाला – काही दिवसांपूर्वी आमची आई रिहाना शहजादी आणि नूरजहाँ नावाच्या महिलांसोबत पंजाबला गेली होती. त्यानंतर ती कधीच परतली नाही. तेव्हा आम्हाला कळलं की ती तर तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.
प्रियकराला बळकवायची आहे जमीन
मनीषने सांगितलं की जेव्हा त्याने रिहाना शहजादी आणि नूरजहाँ यांना त्याच्या आईबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आम्हा दोन्ही भावांना मारण्याची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यांच्या धमक्यांमुळे आम्ही दोघेही खूप घाबरलो आहोत. पुढे तो म्हणाला- रेहाना, नूरजहाँ आणि शहजादी यांनी धमकी दिली आहे की जर आम्ही पोलिसांत तक्रार केली तर ते मला खोट्या प्रकरणात अडकवतील किंवा मला मारतील. खरंतर, आता आईचा तो प्रियकर, आमच्या वडिलांची जमीन आणि इतर सामान हडप करू इच्छितो. म्हणूनच तो आम्हाला धमकावत आहे.
25 जुलै रोजी महिला झाली बेपत्ता
दोन्ही मुलांची विधवा आई 25 जुलैपासून बेपत्ता आहे. पीडित मुलाने त्याच्या आई आणि तिच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत न्याय मागितला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, ज्यांनी हे कृत्य केलं, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे, अशी त्याची मागणी आहे.
