AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायब ओ सायब… वाचवा हो… माझी बायको लई मारतीया… Video पाहून अधिकारीही दचकले; लोको पायलट नवऱ्याची…

मध्य प्रदेशातील लोको पायलट लोकेश कुमार मांझी याने पत्नीकूडन होत असलेल्या बेदम मारहाणीची पोलिसात तक्रार केली आहे. लोकेश याला त्याची बायको बेदम चोप देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.

सायब ओ सायब... वाचवा हो... माझी बायको लई मारतीया... Video पाहून अधिकारीही दचकले; लोको पायलट नवऱ्याची...
Madhya Pradesh NewsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2025 | 12:57 PM
Share

सायब ओ सायब, वाचवा हो… माझी बायको लई मारतीया… रेल्वेच्या एका लोको पायलटची ही आर्त हाक आहे. बायकोच्या मारहाणीमुळे त्रस्त झालेल्या या लोको पायलटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मध्यप्रदेशातील पन्ना येथील ही हादरवणारी घटना आहे. एका बाईने तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण केली. बायकोच्या या त्रासाला वैतागलेल्या व्यक्तीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. एसीपीली एका निवेदन दिलं आणि मला बायकोपासून वाचवा, अशी हातजोडून विनंती त्याने एसपीला केली. या लोकोपायलटने त्याला बायको मारहाण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिली आहे. हे फुटेज पाहून अधिकारीही क्षणभर दचकले.

लोकेश कुमार मांझी असं या लोको पायलटचं नाव आहे. तो मध्यप्रदेशातील सतना येथील राहणारा आहे. लोकेशने त्याची बायको आणि सासूवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने एसपी ऑफिसमध्येच थेट तक्रार केली आहे. बायकोने शारीरिक आणि मानसिकरित्या छळ केल्याचा त्याचा आरोप आहे. त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याची बायको त्याला अत्यंत निर्दयीपणी मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

बायकोकडून न्यायाची मागणी

लोकेशचं लग्न हर्षिता रैकवारसोबत जून 2023मध्ये झालं होतं. लग्नानंतर त्याची बायको, सासू आणि साला त्याच्याकडे पैसे आणि सोन्या चांदीची मागणी करू लागले. पैसे आणि सोन्याचे दागिने देण्यासा लोकेशने नकार दिल्यावर त्याचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात येऊ लागला. मी गरीब घरातील मुलीशी लग्न केलं होतं. हुंडाही घेतला नाही. त्यानंतरही तिच्या कुटुंबीयांनी मला त्रास द्यायला सुरुवात केला, असं लोकेश म्हणाला.

थोबाडात सटासट लगावल्या

लोकेशसोबत झालेला हा प्रकार 20 मार्चचा आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या व्हिडीओत लोकेशची बायको लोकेशच्या कानाखाली सटासटा लगावताना दिसत आहे. तर दुसरीकडे लोकेश हातजोडून माफी मागत आहे. या घटनेनंतर लोकेशने सतना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बायकोच्या छळाला कंटाळल्याने आपण घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. बायकोचे कारनामे त्यात कैद व्हावेत यासाठी हे केल्याचं त्याचं म्हणणं आहे.

आत्महत्येची धमकी देतेय

पोलिसात तक्रार केल्याची माहिती मिळाल्याने बायको मला रोज आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. मुलीलाही जीवे मारण्याची धमकी देत आहे, असा दावा लोकेशने केला आहे. तर या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून याची चौकशी केली जाणार आहे, असं एसपीने म्हटलंय.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.