AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CRIME NEWS : बायकोच्या मदतीने त्याला व्हेलेंटाईन डे साजरा करायला बोलावलं आणि संपवलं

एका इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलीसांना एका 25 वर्षीय तरूणाचा मृतदेह सापडल्याने पोलीस तपासाला लागले. या प्रकरणात एका दाम्पत्यासह तिघांना अटक झाली.

CRIME NEWS : बायकोच्या मदतीने त्याला व्हेलेंटाईन डे साजरा करायला बोलावलं आणि संपवलं
DHANBAD-PATANAImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 22, 2023 | 7:51 PM
Share

नवी दिल्ली : धनबाद-पाटणा इंटरसिटीच्या बोगी क्रमांक 3 मध्ये एका मोठ्या पेटीत मृतदेह सापडल्याने पोलिस अचंब्यात सापडले होते. एका पंचवीस वर्षांच्या तरूणाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीसांच्या तपासाची चक्रे फिरली. मृताची ओळख पटू नये यासाठी आरोपीने एका मोठ्या पेटीत मृतदेह लपवून इंटरसिटीत बेवारसपणे सोडला होता. त्यानंतर आरोपीच्या तपासातून जे सत्य बाहेर आले, त्याने पोलीसही चक्रावले.

13 फेब्रुवारीला पटना जंक्शनवर धनबाद-पटना इंटरसिटी एक्सप्रेसच्या बोगीत मृतदेह सापडल्याचे रेल्वे एसपी अमृतेंदु शेखर यांनी सांगितले. या तरूणाची ओळख पटण्यासाठी झारखंडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दानापूर, धनबाद, आसनसोल आणि वर्धमान येथील पोलीसांची मदत घेतली, त्यानंतर सर्व वर्तमान पत्रांत मृतदेह सापडल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर मृत तरूणाची ओळख पटली, तो शेखपुरातील कमालपुर ठाण्याचा रहीवासी असून त्याचे नाव जगत कुमार महतो ( वय 25 ) असे असल्याचे उघडकीस आले. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलीस या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहचले. या प्रकरणात आरोपी विक्की, त्याची पत्नी आणि विक्कीचा मित्र बिट्टू या तिघांना अटक करण्यात आली.

दोघांची घट्ट मैत्री होती

लखीसरायच्या जोकमैलाचे निवासी विक्की आणि मयत जगत यांची एकदम घट्ट् मैत्री होती. दोघे कोलकाता येथे एकत्र मजूरी करायचे. विक्की याने मे २०२२ मध्ये दुसरे लग्न केले. त्यानंतर दोघेजण लखीसरायच्या गांधी टोला येथे भाड्याचे घर घेऊन राहू लागले. फेब्रुवारी महिन्यात विक्की बिहार गेल्यावर जगत याने त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्याची खबर विक्कीला लागताच त्याचा राग अनावर झाला. त्याला क्राईम पेट्रोल आणि सीआयडी मालिका पहायची सवय होती. त्यातून मग त्याने मित्राच्या हत्येचा प्लान रचला.

‘व्हेलेंटाईन विक’ साजरा करण्यासाठी बोलावले

विक्की याने मित्राच्या  हत्येच्या कटात स्वत:च्या पत्नीला धमकी देत सामावून घेतले. त्याने पत्नीसमोर दोन पर्याय ठेवले. एकतर जगतकडे जाऊन रहायचे किंवा त्याच्या हत्येसाठी सहकार्य करायचे. त्याने पत्नीला जगतला कसेही करून गोड बोलून कोलकाताहून लखीसरायला बोलावले. ‘व्हेलेंटाईन विक’ साजरा करण्यासाठी जगत लखीसरायला आल्यानंतर विक्कीच्या पत्नीने जगत याची खातीरदारी केली आणि दोघांनी मिळून दोरीने त्याचा गळा आवळून त्याला ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पेटीत भरून ती पेटी

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.