Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-वडिलांनीच लेकीसह नातवाला साखळदंडाने बांधलं, 2 महिने डांबलं, कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल !

मुलाने-किंवा मुलीने प्रेमविवाह केला किंवा आंतरधर्मीय लग्न केलं, तर लगेच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. प्रतिष्ठेपायी आईवडील आपल्या पोटच्याच मुलांशी प्रसंगी कसंही वागू शकतात.

आई-वडिलांनीच लेकीसह नातवाला साखळदंडाने बांधलं, 2 महिने डांबलं, कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल !
crime news
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 10:55 AM

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं ? कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची ही कविता खूप प्रसिद्ध आहे. पण आपल्याकडे प्रेमाबद्दल अजूनही थोडी अढी असल्याचं दिसतंच. मुलाने-किंवा मुलीने प्रेमविवाह केला किंवा आंतरधर्मीय लग्न केलं, तर लगेच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. खोट्या प्रतिष्ठेपायी आईवडील आपल्या पोटच्याच मुलांशी प्रसंगी कसंही वागू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे.आंतरधर्मीय विवाह केला म्हणून आई-वडिलांनी त्यांच्याच पोटच्या मुलीला आणि 3 वर्षांच्या चिमुकल्या नातवाला तब्बल 2 महिने साखळदंडाने बांधून डांबून ठेवलं होतं. अखेर भोकरदन पोलिसांनी त्या विवाहितेची सुटका केल्यानंतर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. भोकरदन शहराजवळील एका गावातील ही खळबळजनक घटना आहे. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले.

आंतरधर्मीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या विवाहिता व 3 वर्षाच्या मुलाची सुटका भोकरदन पोलिसांनी सुटका केलीय.भोकरदन शहराजवळील एका गावातील ही धक्कादायक घटना आहे.मुलीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या आई-वडिलांनी तिला व तिच्या 3 वर्षाच्या मुलाला साखळ दंड पायाला बांधूनन तब्बल 2 महिने डांबून ठेवलं होतं. त्यानंतर पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका केली. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगर मध्ये तिच्या पतीच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल ही छत्रपती संभाजीनगर येथे कुटुंबासोबत राहत होती. मिसाळवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला. त्यांना एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. त्यानंतर शहा कुटुंब मूळ गावी आलं. दोन महिन्यांपूर्वी शहनाच्या बहिणीची प्रसूती झाली, त्यावेळी तिच्या आईने बाळाला पाहण्यासाठी शहनाद उर्फ सोनल आणि पतीला आलापूरच्या घरी बोलावलं. मात्र घरी आल्यावर आई-वडिलांनी मुलगी आणि नातवाला घरात ठेवून घेतलं आणि जावयाला हाकलून दिलं.

थोडे दिवसांनी जावई पुन्हा पत्नीला घ्यायला आला असता शहनाजच्या आई-वडिलांनी त्याचा अपमान करून पुन्हा हाकललं. मुलगी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी मुलीच्या आणि नातवाच्या पायाला साखळदंड बाधून घरात डांबून ठेवलं. शहनाज उर्फ सोनलच्या बहिणीने या घटनेची माहिती सोनलच्या नवऱ्याला दिली. त्यामुळे सागरने अखेर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. पत्नी आणि मुलाची सुटका करण्यात यावी ्शी विनंती त्याने न्यायालयाकडे केली.  त्यानुसार, उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना त्या तरूणीची व मुलाची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भोकरदन पोलिसांनी कारवाई करत त्यांची सुटका केली व त्या दोघांना पतीकडे सुखरूपपणे पोहोचवलं.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.