व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू

व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या अशोकस्तंभ परिसरात घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 3:18 PM

नाशिकः व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या अशोकस्तंभ परिसरात घडली आहे. प्रिया सतीश मटुमल, असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रिया सतीश मटुमल (वय 48 रा. विठ्ठल पार्क, अशोकस्तंभ) या रोज सकाळी इमारतीच्या टेरेसवर जाऊन व्यायाम करत असत. मंगळवारी सकाळीही त्यांनी आपला दिनक्रम नेहमीप्रमाणे व्यायमाने सुरू करण्यासाठी त्या इमारतीच्या टेरेसवर गेल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी व्यायमाला सुरुवात केली. मात्र, व्यायाम करताना त्यांचा अचानक तोल गेला. त्या इमारतीवरून थेट जमिनीवर कोसळल्या. या घटनेत प्रिया गंभीर जखमी झाल्या. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

उड्डाणपुलावर उडवले

नाशिकमध्ये द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर घडली. यात घटनेत एका ट्रकने धडक दिल्यामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत झालेला तरुण अविनाश राजेंद्र सूर्यवंशी हा जळगाव जिल्ह्यातल्या गलवाडा येथील होता. सध्या तो सिडकोतल्या दत्त चौकात रहायचा. याबाबत माहिती अशी की, अविनाश हा द्वारका सर्कलकडून दुचाकीवर (एम. एच. 15 डीजी 2239) उड्डाणपुलावरून सिडकोकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम.पी. 09 एच.एच.8267) त्याच्या दुचाकीला उडवले. या घटनेत अविनाश जबर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

नाशिकमध्ये दुचाकीवरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश कारभारी शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीत झाली. याबाबतची माहिती अशी की, महेश शिंदे हे एमआडीसीतून श्रमिकनगरकडे चालला होता. मात्र, अचानक धावत्या दुचाकीवरून ते रस्त्यावर पडले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे हे करत आहेत.

इतर बातम्याः

नाशिक पोलिसांची अनोखी भेट; नागरिकांना आनंदाश्रू आवरेनात, चोरीस गेलेला साडेतीन कोटींचा ऐवज केला परत

धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.