AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगी प्रश्न, चुकीचा स्पर्श, मोबाईल नंबरही दिला… रॅपिडो ड्रायव्हरच्या जवळीकीने भेदरली तरूणी, पोलिसांकडे धाव

रॅपिडो बाईक चालकाने नको तितकी जवळीक दाखवल्याने ती तरूणी भेदरली. संपूर्ण प्रवासात ती गप्प असतानादेखील त्याने तिला खासगी प्रश्न, मोबाईल नंबर विचारत त्रास देणे सुरूच ठेवले होते. यामुळे भेदरलेल्या तरूणीने सरळ पोलिसांत धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली

खासगी प्रश्न, चुकीचा स्पर्श, मोबाईल नंबरही दिला... रॅपिडो ड्रायव्हरच्या जवळीकीने भेदरली तरूणी, पोलिसांकडे धाव
| Updated on: Oct 06, 2023 | 12:47 PM
Share

बंगळुरू | 6 ऑक्टोबर 2023 : महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करूनही अत्याचारांना आळा बसताना दिसत नाही. अजूनही महिलांविरोधातील गुन्हे कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. देशात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार, त्यांना त्रास देणे, विनयभंग असे प्रकार घडतच राहतात. बंगळुरूमध्ये देखील असाच एक प्रकार घडला असून रॅपिडो ड्रायव्हरने नकोसा स्पर्श करत जवळीक साधल्याने एक तरूणी भेदरली . तिने सरळ पोलिसांकडेच धाव घेतली.

बेंगळुरूमधील एका 20 वर्षीय महिलेने रॅपिडो बाईक-टॅक्सी (rapido rider) स्वाराच्या विरोधात लैंगिक छळाची (physical harassment) तक्रार दाखल केली आहे. या ड्रायव्हरने 30 सप्टेंबर रोजी त्या तरूणीसोबत अनुचित वर्तन केले होते. तिच्या तक्रारीनंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कसून शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

आपबिती केली कथन

त्या तरूणीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही राईड तिच्या कॉलेजपासून सुरू झाली आणि घरापाशी थांबली, मात्र त्याच प्रवासादरम्यान रायडरने महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास तिने बाईक राईड सुरू केली आणि पुढल्या 20 मिनिटांमध्ये रॅपिडो ड्रायव्हर मूळ रस्ता सोडून दुसरीकडेच भरकटला. तो तिला सतत तिचं नावं, ती काय तरते आणि कुठून आली आहे ( मूळ गाव) याबद्दल प्रश्न विचारत तिची चौकशी करत होता. पूर्ण प्रवासात ती शांत बसली होती, तरीही त्याने आक्रमकपणे प्रश्न विचारणे सुरूच ठेवले.

जबरदस्ती दिला मोबाईल नंबर

अखेर प्रवास संपवून ते तिच्या घराजवळ पोहोचले, तेव्हा त्या तरूणीने पेमेंट करण्यासाठी रायडरकडे स्कॅनर मागितला. मात्र त्याने तिला स्कॅनर न देता, तिला एक मोबाईल नंबर सांगितला आणि त्यावर पेमेंट करण्याची रिक्वेस्ट केली, असे तरूणीने तिच्या तक्रारीत नमूद केले. तिच्या तक्रारीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या रॅपिडो ड्रायव्हरचा शोध सुरू केला.

रॅपिडोने जाहीर केले निवेदन

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर रॅपिडो कंपनीने एक निवेदन जाहीर केले आहे. “ नुकतीच ही तक्रार मिळाल्यानंतर, आम्ही त्वरीत तपास सुरू केला. आणि हे गैरकृत्य करणाऱ्या त्या संबंधित रायडरला कायमचे निलंबित केले आहे. या विशिष्ट प्रकरणात, कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आमचा पीडित प्रवाशाला पाठिंबा आहे. तिने ही केस पुढे नेण्याचे ठरवल्यास तिला मदत करण्यास आम्ही तत्पर राहू,” असेही कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.