AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेचे ‘लव्ह जिहाद’, नाव बदलून केले पाच विवाह, पिडीत पती म्हणतो… मला वाचवा…

महाराज! माझ्या बायकोचे 5 पती आहेत. मला वाचवा, तिने सगळ्यांना लुटले आहे. आता माझी पाळी आहे असे म्हणत एका पिडीत पतीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. ती पत्नी नाही तर दरोडेखोर आहे. पत्नीने धर्म बदलून पाच लग्न केली आहेत असा आरोपही पतीने केला आहे.

महिलेचे 'लव्ह जिहाद', नाव बदलून केले पाच विवाह, पिडीत पती म्हणतो... मला वाचवा...
FULCHAND KUSHWAHImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 10, 2024 | 6:07 PM
Share

मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पीडित पतीने आपल्या पत्नीचे वर्णन दरोडेखोर असे केले आहे. तिला अनेक पती आहेत. पत्नीपासून वाचण्यासाठी त्याने पोलिसांकडे दाद मागितली आहे. एसपी कार्यालयात जाऊन त्याने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या जुन्या पतीला सोडून नवीन नातेसंबंध सुरू करते. यासाठी ती धर्मही बदलते असा आरोपही त्याने केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

छतरपूर एसपी कार्यालयात जनसुनावणी दरम्यान या पिडीत पतीने आपल्या पत्नीविरोधात एक अर्ज दिला आहे. फूलचंद कुशवाह असे या पिडीत पतीचे नाव आहे. त्याने सांगितले की, विनीता उर्फ ​​ब्रिजेश हिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 2011 मध्ये माझ्याशी लग्न केले. लग्नानंतर समजले की विनीता ब्युटी पार्लरमध्ये काम करते. या व्यवसायाच्या नावाखाली तिचे अनेक समाजकंटकांशी संबंध आहेत. मी त्याचा निषेध केल्याने पत्नीने त्याच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन, छतरपूर येथे खोटी तक्रार दाखल केली.

पत्नी विनिता हिने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतरही तिने आणखी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न केला. तिच्या प्रियकराकडून मला जीवे मारण्याच्या आणि खोटी पोलिस तक्रार दाखल करण्याच्या धमक्या येत आहेत असा आरोपही फूलचंद कुशवाह याने केला. पत्नीपासून आपल्या जीवाला धोका आहे. तिला त्याची मालमत्ता बळकावायची आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला वाचवावे अशी विनंतीही त्याने या अर्जात केली आहे.

पत्नी विनीता उर्फ ​​ब्रिजेश उर्फ ​​सलमा हिने 2000 मध्ये रामवीर तोमर याच्यासोबत लग्न केले होते. तिने रामवीर तोमर याची संपत्ती हडप करून त्याच्याशी संबंध संपवले. 2006 मध्ये पत्नीने धर्म बदलून तिचे नाव सलमा असे ठेवले. त्यानंतर तिने भुरे खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. भुरे खान याचीही मालमत्ता तिने बळकावली आणि ती पुन्हा विनीता सिंग झाली. 2008 मध्ये ती पुन्हा हिंदू झाली आणि तिने टिकमगड येथील अजय खराया याच्यासोबत लग्न केले. 2009 मध्ये तिने छतरपूर येथील जगदीश प्रसाद सिंह यांच्याशी लग्न केले. त्यानंतर 2011 मध्ये तिने माझ्याशी प्रेमाचे नाटक करून लग्न केले अशी माहिती फुलचंद याने पोलिसांना दिली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचे प्रभारी बाल्मिक चौबे यांनी ही बाब आमच्या लक्षात आली आहे. तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. तपास सुरू आहे. तपासाच्या मुद्यांच्या आधारे या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.