AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाद्या, काळजी घे… यावर्षी तुला राखी… बहिणीची अखेरची चिठ्ठी वाचून सर्वच रडले; टोकाचं पाऊल उचलण्याएवढं असं काय घडलं?

राखीच्या सणापूर्वी एका भावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या विवाहीत बहिणीने टोकाचं पाऊल उचलमुळे तो शोकाकुल झाला आहे. राखीपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दाद्या, काळजी घे... यावर्षी तुला राखी... बहिणीची अखेरची चिठ्ठी वाचून सर्वच रडले; टोकाचं पाऊल उचलण्याएवढं असं काय घडलं?
| Updated on: Aug 05, 2025 | 10:46 AM
Share

भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचं प्रतीक असलेला, सर्वांचा आवडता असलेला राखी पौर्णिमेचा अर्थात रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. येत्या शनिवारी, 9 ऑगस्टला रक्षाबंधन असून देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओलते, त्याचं औक्षण करून, मिठाई भरवून त्याला राखी बांधते आणि भाऊ देखील आजन्म तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. मात्र याच राखीच्या सणापूर्वी एका भावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या विवाहीत बहिणीने टोकाचं पाऊल उचलत अवघ्या 24 व्या वर्षी आयुष्य संपवल्यामुळे तो शोकाकुल झाला आहे. राखीपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

आंध्रप्रदेशच्या कलावापमुला गालवात ही दुर्दैवी घटना घडली असून तेथे 24 वर्षांच्या विवाहीत महिलेने आत्महत्या केली. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. श्रीविद्या असे तिचे नाव असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच रामबाबू नावाच्या इसमाशी तिचं लग्न झालं होतं. मात्र सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, तिच्या पतीने रामबाबूने श्रीविद्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. दारू पिऊन घरी येणं, तिला मारहाण करणं आणि निर्दयीपणं छळ करणे हे खूप कॉमन झालं होतं.

मृत्यूपूर्वी लिहीली नोट

एका खाजगी महाविद्यालयात लेक्चरर असलेल्या श्रीविद्याने मृत्यूपूर्वी एक नोट लिहीली होती. तिचा पती, रामबाबू याने दुसऱ्या महिलेसमोर तिचा अपमान केला आणि तिला ‘बेकार’ म्हटल्याचं तिने चिठ्ठीत नमूद केलं होतं. एवढंच नव्हे तर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले, तिचे डोके बेडवर आपटण्यात आले आणि पाठीत ठोसाही मारण्यात आला असा आरोप तिने नोटमध्ये केला होता.

दादा, तुझी काळजी घे, यावर्षी राखी नाही बांधू शकणार

या नोटमध्ये तिने तिच्या भावासाठीदेखील एक मेसेज लिहीला होता. ” दादा, स्वतःची काळजी घे… या वर्षी मी कदाचित तुला राखी बांधू शकणार नाही” असा हृदयद्रावक मेसेज तिने लिहीला. तसेच तिच्या या स्थितीसाठी पती रामबाबू आणि त्यांच्या कुटुंबाला जबाबदार धरत, श्रीविद्या हिने तिच्या चिठ्ठीच्या शेवटी अशी मागणी केली की, त्यांना (सासरचे लोक) कोणत्याही परिस्थितीत सोडू नये.त्यानंतर तिने गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.

सासरच्या घरात छळ आणि हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे आत्महत्येची ही पहिलीच घटना नाही, तर अशी अनेक प्रकरणे दररोज समोर येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पीडितेने तिच्या मुलासह आत्महत्या केली आहे. काही महिन्यापूर्वीच पुण्याजवळ वैष्णवी हगवणे या विवाहीनेते देखील सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.