लग्नाच्या चार दिवसांआधी नवरदेवाला कोल्ड्रिंकमधून विष पाजलं, नववधूसह प्रियकराला अटक

सोनवाढोना येथील प्रियकरानेच आपल्याला होणाऱ्या नवऱ्याला विष देण्यास सांगितले, अशी धक्कादायक कबुली नववधूने यवतमाळ पोलिसांसमोर दिली (Yawatmal Bride attempts to Murder Groom)

लग्नाच्या चार दिवसांआधी नवरदेवाला कोल्ड्रिंकमधून विष पाजलं, नववधूसह प्रियकराला अटक
आईस्क्रिम पार्लरमधील सीसीटीव्ही फूटेज

यवतमाळ : लग्नाच्या चार दिवसांआधी, होणाऱ्या नवऱ्याला नववधूनेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. शीतपेयातून विष पाजून तरुणीने होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा प्लॅन आखल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आलं. प्रेमसंबंधात अडसर ठरल्यामुळे प्रियकराच्या मदतीने नवरदेवाच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक कबुली नववधूने नेर पोलिसांना दिली आहे. यावरुन तालुक्यातील सोनवाढोना येथील एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Yawatmal Bride attempts to Murder Groom with Boyfriend by Poisoning through Cold Drink)

आईस्क्रिम पार्लरमध्ये बोलावून शीतपेयातून विष

हिंदी चित्रपट किंवा क्राईम सीरियलना शोभेल असा प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे. नेर तालुक्यातील कोहळा येथील 22 वर्षीय तरुणाला बाभुळगाव तालुक्यातील जांभुळणी येथील त्याच्या भावी पत्नीने ठार मारण्याचा डाव रचला. लग्नाच्या चार दिवस आधी आईस्क्रिम पार्लरमध्ये बोलावून शीतपेयातून तिने त्याला विष पाजले होते. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावरुन नेर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, हत्येचा कट रचणे या सारखे गंभीर गुन्हे नववधू आणि तिच्या दोन भावासह बहिणींवर दाखल केले.

नववधूला न्यायालयीन कोठडी

पोलिसांसमोर संबंधित तरुणीने हा सर्व घटनाक्रम सांगितला. सोनवाढोना येथील प्रियकरानेच नववधूला होणाऱ्या नवऱ्याला हे विष देण्यास सांगितले, अशी धक्कादायक कबुली तिने पोलिसांसमोर दिली. हे प्रकरण न्यायालयात गेले असल्याने आरोपी नववधूला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

लग्न रद्द झाल्यावर पळून जाण्याचा प्लॅन

आरोपी नववधू्चे लग्न 19 एप्रिलला घरच्या जेष्ठ व्यक्तींच्या साक्षीने फिर्यादी मुलगा ‘किशोर’सोबत ठरले होते. हेच त्या नववधूच्या प्रियकराला खटकले. त्यामुळे ठरलेले लग्न होऊ नये म्हणून त्याने नववधूला शीतपेयात विषारी पावडर टाकण्यास सांगितले. तसेच नवरदेवाची तब्येत बिघडून ठरलेल्या मुहूर्तावरचे लग्न रद्द होईल, नंतर पळून जाऊ, असे प्रियकराने नववधूला सांगून हा सर्व प्रकार करायला लावला असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

संबंधित बातम्या :

नवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात

महिनाभरापूर्वी लग्न, विवाहबाह्य संबंधांचा संशय, दोन नववधूंची पतीकडून हत्या

(Yawatmal Bride attempts to Murder Groom with Boyfriend by Poisoning through Cold Drink)