Sidhu Moosewala: “होय, माझ्याच गँगने सिद्धू मूसेवालाची हत्या केली”; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली

याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं (Lawrence Bishnoi) नाव समोर आलं होतं. आता मूसेवालाच्या हत्येप्रकरणी या गँगस्टरने मौन सोडलं आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान लॉरेन्स बिश्नोईने गुन्ह्याची कबुली दिली.

Sidhu Moosewala: होय, माझ्याच गँगने सिद्धू मूसेवालाची हत्या केली; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कबुली
Lawrence Bishnoi and Sidhu MoosewalaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 12:34 PM

प्रसिद्ध पंजाबी गायक (Punjabi Singer) सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं (Lawrence Bishnoi) नाव समोर आलं होतं. आता मूसेवालाच्या हत्येप्रकरणी या गँगस्टरने मौन सोडलं आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान लॉरेन्स बिश्नोईने गुन्ह्याची कबुली दिली. माझ्याच गँगच्या माणसांनी मूसेवालाची हत्या केली, असं तो म्हणाला. “कॉलेजमध्ये असल्यापासूनच विक्की मिद्दुखेडा माझा मोठा भाऊ होता, माझ्या ग्रुपने त्याच्या हत्येचा बदला घेतला आहे,” अशी कबुली लॉरेन्सनं दिली. मूसेवाला त्याच्या खेड्यात जीपमधून जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

लॉरेन्स सध्या तिहार जेलमध्ये आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान तो म्हणाला, “यावेळी हे काम माझं नाही. कारण मी तुरुंगात आहे आणि फोनचा वापरसुद्धा करत नाहीये. पण मी हे कबुल करतो की सिद्धू मूसेवालाची हत्या माझ्याच गँगने केली. मला त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती तिहार तुरुंगातील टीव्हीवर बातम्या पाहताना मिळाली.”

30 वर्षीय लॉरेन्स बिश्नोई हा गुन्हेगारांच्या 700 सदस्यांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याने तो पोलिसांच्या रडारखाली आला आहे. बिश्नोईचा जवळचा सहकारी ब्रार याने गेल्या वर्षी युवा अकाली दलाचे नेते विकी मिद्दुखेडा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मूसेवालाची हत्या केल्याचं फेसबुकद्वारे म्हटलं. त्याने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

हे सुद्धा वाचा

सिद्धू मूसेवालाच्या हत्येला पाच दिवस झाले आहेत. या हत्येप्रकरणी पंजाबपासून दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तरप्रदेश इतकंच नव्हे तर कॅनडापर्यंतचं कनेक्शन समोर आलं आहे. हत्येपूर्वी सिद्धूच्या घराबाहेर रेकी करताना आणि हत्येनंतर धावत्या गाड्यासुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. सिद्धूच्या हत्येनंतर आरोपींनी जी ऑल्टो कार लुटली होती, पोलिसांन तीसुद्धा जप्त केली आहे. इतकं सगळं होऊनही याप्रकरणी अद्याप पोलिसांच्या हाती गुन्हेगार लागले नाहीत. ते सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचीच चौकशी करत आहेत.

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला इथल्या अबोहर भागात राहणारा आहे. 2018 मध्ये त्याने जेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.