प्रेयसी, तिची बहीण, आईला जीवे मारलं, सेशन कोर्टाकडून जन्मठेप, आरोपीची हायकोर्टात धाव, न्यायाधीशांनी झापलं

हायकोर्टाने आरोपीची याचिका फेटाळली. तसेच अशा प्रकारे आरोपीची शिक्षा रद्द करता येणार नाही, असं आरोपीच्या वकिलालाही सुनावलं (Youth killed his girlfriend and her two family members).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:21 PM, 3 May 2021
प्रेयसी, तिची बहीण, आईला जीवे मारलं, सेशन कोर्टाकडून जन्मठेप, आरोपीची हायकोर्टात धाव, न्यायाधीशांनी झापलं
Bombay High Court

मुंबई : महाराष्ट्रात एक सुन्न करणारी घटना घडली होती. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची, तिच्या आई आणि बहिणीची हत्या केली होती. या घटनेविरोधात मृतक प्रेयसीच्या मोठ्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीस अटक झाली होती. कोर्टाने आरोपीला तिघांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सुनावणी विरोधात आरोपीचे नातेवाईक हायकोर्टात गेले होते. त्यांनी आरोपीची बाजू मांडत याचिका दाखल केली होती. याप्रकरणावर हायकोर्टाने नुकतीच अंतिम सुनावणी केली. कोर्टाने आरोपीची याचिका फेटाळली. तसेच अशा प्रकारे आरोपीची शिक्षा रद्द करता येणार नाही, असं आरोपीच्या वकिलालाही सुनावलं (Youth killed his girlfriend and her two family members).

हायकोर्ट नेमकं काय म्हणालं?

“साक्षीदार खोटं बोलू शकतात. पण घटनास्थळावरची परिस्थिती ही खोटी राहणार नाही. तपासातील एखादा नजरेआड झालेल्या मुद्याला धरुन आपण निर्दोष आहोत, असा सिद्ध करण्याचा प्रयत्न करता येणार नाही. कारण पोलीस संपूर्ण तपास करुन त्या निष्कर्षावर आलेले आहेत. यामुळे नको त्या खोट्या गोष्टी दाखवून आरोपी निर्दोष आहे, असं म्हणणं योग्य नाही. याशिवाय ते न्यायाच्या नियमांच्या विरोधात आहे”, अशा शब्दात हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी आरोपीच्या वकिलांना झापलं.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी अशोक धवले या तरुणाने 2015 साली त्याची प्रेयसी, तिची बहीण आणि आईची हत्या केली. याप्रकरणी कोर्टाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह लपवले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर काही दिवसांनी त्याच्याजवळ मृतदेह मिळाले (Youth killed his girlfriend and her two family members).

हत्येची घटना उघडकील कशी आली?

मृतक प्रेयसीची मोठी बहीण ही विवाहित असून ती रायगड जिल्ह्यात वास्तव्यास होती. आरोपीने ज्यादिवशी हत्या केली त्यादिवशी रायगडमधील महिलेने सहज आपल्या आईला फोन लावला. मात्र, तिची आई फोन उचलत नव्हती. त्यानंतर महिलेने तिच्या लहान बहिणीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने सांगितलं की, आई भावाच्या घरी गेली आहे. त्यानंतर महिलेने आपल्या आईसोबत बोलण्यासाठी इतर नातेवाईकांना फोन केला. पण तिची आईसोबत बातचित होऊ शकली नाही. त्यानंतर तिने पुन्हा आपल्या लहान बहिणीला फोन केला. मात्र, यावेळी तिचा फोन स्वीच ऑफ येत होता.

अलिबाग सेशन कोर्टाक़डून जन्मठेपेची शिक्षा

महिलेल्या तिच्या चुलत भावाकडून माहिती मिळाली की, तिच्या एका बहिणीचं अशोक धवले नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, अशोकच्या कुटुंबियांचा या गोष्टीला विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये सतत वाद सुरु होता. महिलेला अशोक धवले तरुणावर संशय आला. तिने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा आरोपी अशोकजवळ तीन मृतदेह मिळाले. मात्र, तोपर्यंत बराच वेळ झाला होता. पोलिसांना आरोपीकडे मृतक मुलगी आणि त्याच्यातील प्रेम पत्र देखील मिळाले. अलिबाग सेशल कोर्टाने आरोपी अशोकला दोषी मानून जन्मठेपाची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेला आव्हान देणारी याचिका आरोपीच्या नातेवाईकांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली. ही याचिका कोर्टाने आता फेटाळली आहे.

हेही वाचा : बायकोसमोर शाईनिंग, लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला, नवरोबाला बेड्या