VIDEO : ‘मला आठवाल तेव्हा फक्त हसा’, सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तरुणाची आत्महत्या

कल्याणच्या गांधीरी पुलावरुन एका 22 वर्षीय तरुणाने नदीत उडी मारुन आत्महत्या केली (Youth share video on social media before commits suicide in Kalyan).

VIDEO : 'मला आठवाल तेव्हा फक्त हसा', सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तरुणाची आत्महत्या
'माझंही एक स्वप्न होतं, पण...', आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आत्महत्या

कल्याण (ठाणे) : कल्याणच्या गांधीरी पुलावरुन एका 22 वर्षीय तरुणाने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. या तरुणाचं नाव मयूर जाधव असं आहे. मयूरने आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ बघितल्यानंतर तो नैराश्यात होता. हे लक्षात येतंय. आपलं देखील एक स्वप्न होतं. पण आता काहीच रस्ता राहिलेला नाही, असं मयूर या व्हिडीओत बोलताना दिसतो. मयूर हा त्याच्या आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयूरने आत्महत्या करुन आपल्या आई-वडिलांनाच पोरकं केलं आहे.

मयूर आत्महत्या करण्याआधी नेमकं काय म्हणाला?

मयूरने त्याच्या व्हाट्सअॅप स्टेटसवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओत तो म्हणतो, “एक स्वप्न होतं. पण काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे समोर काहीच रस्ता दिसत नाहीय. मला एवढंच बोलायचं आहे, माझी जेव्हा कधी आठवण काढाल तेव्हा हसून आठवण काढा. कारण तुमच्या जीवनात एक असा जोकर होता जो स्वत: आतमधून खूप तुटलेला असून तुम्हाला हसवण्यासाठी काहीही करायचा”.

दुसऱ्या व्हिडीओत तो दारु वाईट असल्याचं म्हणतोय. “दारु माणसाच्या जीवनातील खूप वाईट गोष्ट आहे. आज त्याच दारुमुळे.. जाऊद्या नाही बोलत. ओम साई!”, असं म्हणत मयूर मोबाईलचा कॅमरा बंद करतो.

मयूरचा शोध सुरु

कल्याण पश्चिमेतील कल्याण-पडघा रोडवर गांधारी पूल आहे. या पूलावरुन दुपारच्या सुमारास एका तरुणाने आपली स्कूटी गाडी पूलाच्या बाजूला लावली. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली, अशी माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच खडकपाडा पोलीस गांधारी पूलावर दाखल झाले. अग्नीशमन दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहचले. स्कूटीवरील जो नंबर होता. त्या आधारे या तरुणाचा घरचा पत्ता शोधून काढण्यात आला. मयूर जाधव असे या तरुणाचे नाव आहे. तो कल्याण पश्चिमेतील बारावे परिसरात राहणारा आहे, अशी माहिती तपासात समोर आली. अग्नीशमन दलाकडून मयूरचा शोध सुरु आहे.

पोलिसांचा तपास सुरु

या प्रकरणाचा तपास पडघा पोलीस करणार आहेत. मयूरने आत्महत्या नक्की का केली? हे पोलिसांच्या तपासाअंती उघड होणार आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Youth share video on social media before commits suicide in Kalyan).

हेही वाचा : 28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI