Kolhapur Crime News : मोबाईलवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

महेश घोलप, Tv9 मराठी

|

Updated on: Aug 05, 2022 | 2:54 PM

महाराष्ट्रात आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. रोज आत्महत्या केलेल्या गोष्टी कानावर येत आहेत. त्याचबरोबर त्याची कारण देखील अगदी क्षुल्लक असल्याचं स्पष्ट आहे.

Kolhapur Crime News : मोबाईलवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
अमृतसरमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब

कोल्हापूर – कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ (Shirol) तालुक्यातील दत्तवाड येथील एका बारावी विद्यार्थ्यांने आत्महत्या (suicide) केली आहे. रात्री दोनच्या सुमारात त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. कारण त्याने आत्महत्या करण्यापुर्वी त्यांच्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवला होता. पोलिस चौकशी करीत असून अद्याप कारण अस्पष्ट असल्याचं समजतंय. सिद्धार्थ जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावं आहे.सिद्धार्थच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे परिसरातही नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. पोलिसांनी तिथला पंचनामा केला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून गरजेची माहिती घेतली आहे. तरुणाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यातून गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाईलवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

मोबाईलवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या, शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथली धक्कादायक घटना आहे. तरुणाने मध्यरात्री घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला आहे. अद्याप या प्रकरणातील कारण अस्पष्ट आहे. तरुण बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. तसेच तरुणाच्या कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे नेमकी आत्महत्या का केली ते कारण स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक वाढलं

महाराष्ट्रात आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. रोज आत्महत्या केलेल्या गोष्टी कानावर येत आहेत. त्याचबरोबर त्याची कारण देखील अगदी क्षुल्लक असल्याचं स्पष्ट आहे. सध्या सिध्दार्थ जाधव यांनी केलेल्या आत्महत्येचं अधिक चर्चा आहे. कारण त्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI