धारावीत आठ वर्षीय मुलावर अत्याचार, 25 वर्षीय नराधमाचं कृत्य

धारावीत 25 वर्षाच्या नराधमाने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केला (Boy rape in Dharavi) आहे.

धारावीत आठ वर्षीय मुलावर अत्याचार, 25 वर्षीय नराधमाचं कृत्य

मुंबई : धारावीत 25 वर्षाच्या नराधमाने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केला (Boy rape in Dharavi) आहे. खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना धारावीतील मरिअम्मा मंदिराजवळ घडली. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून काल (23 जुलै) रात्री त्याला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (Boy rape in Dharavi) आहे.

आरोपी 22 जुलैला दुपारच्या दरम्यान अल्पवयीन मुलाला खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून मरिअम्मा मंदिराजवळ घेऊन गेला. तिथे त्याने कुणी नसल्याचे पाहून मुलावर अत्याचार केला. यावेळी त्यांच्या येथे राहणारा मुलगा तेथे आल्याने आरोपी लहान मुलाला टाकून पळून गेला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अत्याचारानंतर मुलाला त्रास होत होता. पण भीतीपोटी मुलाने घरात सांगितले नाही. मुलाला त्रास होत असल्याचे पाहून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सत्य उजेडात आले. यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे धारावीतील पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

संबंधित बातम्या :

नागपुरात भाडेकरु दाम्पत्याकडून घर मालकिणीचं लैंगिक शोषण, पती-पत्नीला अटक

Ghaziabad Journalist Murder | भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *