AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cybercrime | अ‌ॅप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने 9 लाखांना चुना

सायबर गुन्हेगारी विश्वात रोजच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे  घडतात. मात्र, अ‌ॅप डाऊनलोड करायला लावून गोपनीय माहिती मिळवत बॅंक खात्यातील तब्बल 9 लाख रुपये लुटल्याचा नवा प्रकार नागपुरात समोर आला आहे.

cybercrime | अ‌ॅप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने 9 लाखांना चुना
| Updated on: Nov 11, 2020 | 5:05 PM
Share

नागपूर : सायबर गुन्हेगारी विश्वात रोजच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे  घडतात. मात्र, अ‌ॅप डाऊनलोड करायला लावून गोपनीय माहिती मिळवत बॅंक खात्यातील तब्बल 9 लाख रुपये लुटल्याचा नवा प्रकार नागपुरात समोर आला आहे. मोबाईलवरुन मनी ट्रान्जेक्शन वाढवण्याच्या नादात हा प्रकार घडला आहे. (9 lakh rupees looted from a bank account by cyber criminals)

मिळालेल्या माहितीनुसार अशोक मनवते यांचा मुलगा त्यांच्या मोबाईलवरुन मनी ट्रान्जेक्शन वाढवण्यासाठी गुगलवर नंबर आणि वेगवेगळ्या पद्धती शोधत होता. यावेळी त्यांच्या मुलाला गुगलवर एक नंबर सापडला. या नंबरवर कॉल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने ट्रान्जेक्शन लिमीट वाढवून देतो असे सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्ती आणि मुलामध्ये संवाद वाढत गेला.

अज्ञाताने मुलाला मनवते यांच्या मोबाईलमध्ये अ‌ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर अज्ञाताने या अ‌ॅपद्वारे मनवते यांच्या खात्याची सर्व गोपनीय माहिती मिळवली. आणि बघात बघता मनवते यांच्या खात्यातून तब्बल 9 लाख रुपये लंपास झाले. हा प्रकार समजताच  मनवते यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, चुकीचे अ‌ॅप आणि गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तीला सांगितल्यामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी सायबर कायद्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. यावेळी कुठल्याही अज्ञात व्यक्तीकडून असे फोन वा काही निर्देश आले तर त्यांना प्रतिसाद देऊ नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे. तसेच आपल्या सर्व ऑनलाईन व्यवहारांची माहिती कुणासोबतही शेअर न करण्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट, सायबर विभागाच्या तपासात उघड

राज्यात सायबर सुपारीचा वाढता ट्रेंड, महिलांविरोधात सर्वाधिक सायबर गुन्हे, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

नागपुरात लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठी वाढ, महिला सॉफ्ट टार्गेट

(9 lakh rupees looted from a bank account by cyber criminals)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.