Beed Murder | बीडमध्ये माय लेकांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, तर दुसऱ्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवलं

आई आणि एका मुलाला दगडांनी ठेचून त्यांची हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून त्याची हत्या करण्यात आली.

Beed Murder | बीडमध्ये माय लेकांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, तर दुसऱ्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवलं

बीड : बीडमध्ये आईसह दोन मुलांचा निर्घृण खून करण्यात (Beed Triple Murder Case) आला आहे. या घटनेने बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. ही घटना शहरातील शुक्रवार पेठ भागात रविवारी (24 मे) भर दुपारी घडली. संगीता संतोष कोकणे आणि तिची दोन मुलं यांचा खून करण्यात (Beed Triple Murder Case) आला आहे.

आई आणि एका मुलाला दगडांनी ठेचून त्यांची हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान संशयित म्हणून महिलेचा पती संतोष कोकणे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

संगीता संतोष कोकणे (वय-31), संदेश संतोष कोकणे (अंदाजे वय-10) या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर मयूर संतोष कोकणे (वय-7) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून घरात कौटुंबिक वाद सुरु होते. मात्र, या माय लेकांचा खून का झाला? यामागील कारण सध्या अस्पष्ट आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे (Beed Triple Murder Case). मात्र, या खूनामागील खरे कारण हे चौकशी नंतरच समोर येईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृत महिलेचा पती संतोष कोकणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पेठ बीड पोलीस करीत आहेत.

Beed Triple Murder Case

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या

Zoom APP वर व्हिडीओ चॅट करत असलेल्या वडिलांची मुलाकडून हत्या, वेगवेगळ्या चाकूने 15 वार

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

ठाण्यात दोन गट भिडले, सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याने ‘फिल्मी’ राडा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *