दिवसभर फाटके कपडे घालून वेडसरपणे फिरायचं, रात्री चोरी, लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी मोठा आरोपी पकडला

लॉकडाऊनच्या काळात वेडसर दिसणारा युवक अट्टल चोर निघाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये समोर आली आहे (Chandrapur police caught the thief amid lockdown).

दिवसभर फाटके कपडे घालून वेडसरपणे फिरायचं, रात्री चोरी, लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी मोठा आरोपी पकडला
Follow us
| Updated on: Jun 01, 2020 | 7:11 PM

चंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळात वेडसर दिसणारा युवक अट्टल चोर निघाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये समोर आली आहे (Chandrapur police caught the thief amid lockdown). चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी पाळत ठेवून या अट्टल घरफोड्याला अटक केली आहे. हा आरोपी शहरातील रस्त्यांवर बावळपणाचा वेश घेऊन फिरायचा आणि कोठे काय आहे याची पाळत ठेवायचा. मात्र, रात्री याच माहितीचा उपयोग करुन तो चोरी आणि घरफोड्या करायचा.

या आरोपीने शहरातील अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. या तपासात संजय गांधी व्यापार संकुलातील चोऱ्यांसह रेल्वे स्टेशन भागातील चोऱ्याही उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी या वेडसर वेशातील अट्टल चोराकडून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. गेले 3 महिने शहरात लॉकडाऊन होता. मात्र, असं असतानाही चंद्रपूरमधील बंद असलेल्या दुकानांमधून चोरी होत होती. या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हान ठरल्या होत्या. यानंतर चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी शहरात वेडेपणाचं सोंग घेऊन फिरत असलेल्या एका युवकावर पाळत ठेवली. यात संबंधित युवकावर संशय बळावल्याने या चोऱ्यांप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आणि तपासात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले.

चंद्रपूरच्या संजय गांधी व्यापार संकुल आणि रेल्वे स्थानक परिसरातील ताज्या घटनांनंतर पोलिसांनी या भागात पाळत ठेवली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांना वेडेपणाचं सोंग घेऊन शहरात चोऱ्या करणाऱ्या आरोपी मंगेश कुमरे नावाच्या युवकाला अटक करण्यात यश आले आहे. तो शहरातील रस्त्यांवर दिवसा बावळट वेश घालून वेडेपणाचं सोंग करायचा. दिवसा सावज हेरायचा आणि रात्री त्यावर हात साफ करायचा अशी या चोराची मोडस ऑपरेंडी होती. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अटक केली. त्यानंतर हा एक शिक्षित युवक असून तो बावळट वेश परिधान करत अट्टल चोरीचे आपले गुन्हे लपवत असल्याचं उघड झालं. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडी आणि दुकान फोडीतून जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा :

गोरेगाव फिल्मसिटी काम, मुंबई-नागपूर विमानाने प्रवास, चंद्रपुरात पोहोचलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना हॉटस्पॉट मालेगावातील आर्थिक चाकं फिरली, यंत्रमाग उद्योग सुरु झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला काम

केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक, शेतकरी आणि मजुरांसह इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा

Chandrapur police caught the thief amid lockdown

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.