कोरोना हॉटस्पॉट मालेगावातील आर्थिक चाकं फिरली, यंत्रमाग उद्योग सुरु झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला काम

मालेगावमधील सुमारे 18 हजार यंत्रमाग सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे उपसमारीची वेळ आलेल्या सुमारे 10 हजार मजुरांच्या हाताला काम मिळालं आहे (Handloom industry in Malegaon started).

कोरोना हॉटस्पॉट मालेगावातील आर्थिक चाकं फिरली, यंत्रमाग उद्योग सुरु झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला काम

नाशिक : मालेगावातील आर्थिक कणा असलेला यंत्रमाग उद्योग पुन्हा एकदा सुरु झाला आहे. शहरातील सुमारे 18 हजार यंत्रमाग सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे उपसमारीची वेळ आलेल्या सुमारे 10 हजार मजुरांच्या हाताला काम मिळालं आहे (Handloom industry in Malegaon started). त्यामूळे शहरातील जनजीवन पूर्ववत होण्यास हातभार लागला आहे.

नाशिक जिल्ह्यात मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका यंत्रमाग उद्योगाला बसला. आधीच मंदीमुळे संकटात सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला कोरोनाने अगदी संपवलंच होतं. त्यामुळे यावर काम करुन उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणाऱ्या सुमारे 2 ते 3 लाख मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि मजुरांची होणारी उपासमार हे लक्षात घेता शहरातील अर्थकारणाचा प्रमुख घटक असलेला यंत्रमाग उद्योग कंटेनमेंट झोनबाहेर सुरु करण्यात आला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व निर्बंध कायम आहेत. यासाठी सरकारने अटी आणि शर्ती देखील लागू केल्या आहेत. त्यानुसार हे उद्योग सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

शहरातील उद्याने ,राजनगर, म्हाळदे शिवार, आझाद नगर, सवंदगाव, देवीचा मळासह शहराबाहेरील महामार्गाजवळ असलेले यंत्रमाग सुरु झाले आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळालं असून लॉकडाऊनच्या काळात होणारे त्यांचे हाल कमी होण्यास मदत होईल, अशी भावना मजुरांनी व्यक्त केली आहे. हळूहळू शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच यंत्रमाग सुरु होणार आहे. त्यामुळे यंत्रमाग मजूर आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतर घटकांची आर्थिक अडचण दूर होऊन शहराचा गाडा रुळावर येण्यास नक्कीच मदत होईल, अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मालेगावमध्ये अजुनही कोरोना बाधित नवे रुग्ण आढळत आहेत. आज सकाळी आलेल्या अहवालात 5 नवीन रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णांमध्ये 1 मुंबई रेल्वे पोलीस आणि धुळे येथील 1 एसआरपीएफचा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. गेल्या 24 तासात मालेगावात 19 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मालेगावमधील कोरोना बधितांची संख्या 784 वर पोहचली आहे. मालेगावात एकाच दिवसात 3 कोरोना बाधित रुग्णांचाही मृत्यू झाला. यासह मालेगावमधील कोरोना बळींचा आकडा 55 झाला आहे. मालेगावमध्ये सध्या 113 कोरोना रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मालेगावमध्ये कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण झालेल्या 150 पोलिसांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

संबंधित व्हिडीओ :

लॉकडाऊनदरम्यान रस्त्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, नाशिकच्या पोलीस पठ्ठ्याने बाटलीतून बाग फुलवली

गोरेगाव फिल्मसिटी काम, मुंबई-नागपूर विमानाने प्रवास, चंद्रपुरात पोहोचलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 हून अधिक कोरोनाबाधित, कोणत्या तालुक्यात किती?

Handloom industry in Malegaon started

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *