धुळ्यात बनावट दारुचा मोठा कारखाना उद्ध्वस्त, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

धाडणे – शेणपूर शिवारात बनावट दारुचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे.(Dhule Fake liquor factory demolished) 

  • विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे
  • Published On - 12:18 PM, 26 Nov 2020

धुळे : धाडणे – शेणपूर शिवारात बनावट दारुचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. बनावट दारुच्या साहित्यासह 26 लाख 59 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साक्री पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. साक्री – ग्रामीण विभागाचे डीवायएसपी प्रदीप मैराळे यांनी ही कामगिरी केली. (Dhule Fake liquor factory demolished)

डीवायएसपी प्रदीप मैराळे यांना मिळालेल्या माहितीवरुन, शेणपूर शिवारातील डोंगर टेकडी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारुचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर.व्ही.निकम, पीएसआय बी.बी.नन्हे इत्यादींच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात रसायन, स्पिरीट, देशी-विदेशी दारु तयार करण्याचे साधने मिळून आली.

या घटनास्थळावरुन दुर्वेश भालचंद्र अहिरराव यांच्यासह अन्य 13 जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच बनावट लेबल दारुची खोकी, रिकाम्या बाटल्या, बूच लावण्याचे मशीन, धर्मोमिटर, प्लास्टिकचे ड्रम, मोटर, एक बोलेरो वाहन, एक स्लेंडर दुचाकी, ओपो कंपनीचा मोबाईल, रेडमी कंपनीचा मोबाईल, सॅमसंग मोबाईल, टेक्नो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी बनावट दारुचा कारखान्यात 26 लाख 59 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी प्रदिप मैराळे यांच्या पथकाने केली आहे. साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dhule Fake liquor factory demolished)

संबंधित बातम्या : 

प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी

जबरी चोरी करणाऱ्यांना सापळा लावून अटक, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त