बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडल्याने कोल्हापुरात सूनेने सासूचा काटा काढला

पती कर्नाटकात गेल्याची संधी साधून पत्नीने प्रियकराला घरी बोलावलं. मात्र त्या दोघांना सासूने रंगेहाथ पकडल्यामुळे त्यांनी लाकडी दांडक्याने प्रहार करुन सासूची हत्या केली.

बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडल्याने कोल्हापुरात सूनेने सासूचा काटा काढला

कोल्हापूर : अनैतिक संबंधांचं बिंग फुटल्यामुळे सुनेने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार (Kolhapur Lady Killed Mother in Law) कोल्हापुरात उघडकीस आला आहे. 24 वर्षीय विवाहितेला तिच्या बॉयफ्रेण्डसह गडहिंग्लज पोलिसांनी गजाआड केलं आहे.

कोल्हापुरातील हलकर्णीमध्ये राहणाऱ्या संतोष मल्लाप्पा पाटीलचा माल वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्याची पत्नी मालाश्री पाटील गडहिंग्लजमधील एका महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत होती. तिथे तिचे एका तरुणाशी सूत जुळल्याचा संशय पती संतोषला होता. मालाश्री वारंवार फोनवर बोलत असल्यामुळे त्याने तिला अनेक वेळा समजही दिली होती.

रविवारी पती संतोष कर्नाटकात गेला असताना रात्री संतोषची पत्नी मालाश्री हिने 24 वर्षीय प्रियकर रुपेश लब्यागोळ याला घरी बोलावलं. मात्र मालाश्री आणि रुपेश यांना सासूने रंगेहाथ पकडल्यामुळे दोघांची पाचावर धारण बसली होती.

‘तुझा पराक्रम नवर्‍याला सांगते’ अशी धमकी सासूने सूनेला दिली. सासूने नवऱ्याकडे याची वाच्यता केल्यास अनर्थ ओढावेल, या भीतीने दोघांनी बसव्वा यांची डोक्यात लाकडी दांडका घालून निर्घृण हत्या (Kolhapur Lady Killed Mother in Law) केली.

बलात्काराचा प्लॅन फसला, आमदाराच्या भाचीची बॉयफ्रेण्डसह हत्या

हलकर्णीमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची माहिती गडहिंग्लज पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस तपासासाठी संतोष पाटीलच्या घरी गेले. त्यावेळी भेदरलेल्या मालाश्रीने बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मध्यरात्री दोन मास्कधारी तरुण घरात घुसले. त्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी विरोध केल्यामुळे त्यांनी सासूवर हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला, असा दावा सूनेने केला.

आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथकांनी हलकर्णी पिंजून काढलं. आजरा, चंदगडमधूनही पोलिस बोलावण्यात आले. हलकर्णी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फूटेजची तपासल्यावर गावात रात्रीच्या वेळी कोणीच आल्याचं आढळलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या मनात मालाश्रीविषयीच संशय बळावला.

पती संतोष यानेही पत्नीवर संशय व्यक्त केल्यामुऴे पोलिसांनी दोघांना हिसका दाखवला. अखेर बॉयफ्रेण्ड रुपेशच्या मदतीने सासूची हत्या केल्याची कबुली तिने दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *