हत्या, बलात्काराच्या आरोपात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा 75 वर्षीय वृद्धेवर बलात्कार, नराधमाला बेड्या

या गुन्हेगाराने 2017 मध्ये 56 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्याप्रकरणी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती.

हत्या, बलात्काराच्या आरोपात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा 75 वर्षीय वृद्धेवर बलात्कार, नराधमाला बेड्या

आगरतळा : त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात हत्या आणि बलात्कारच्या आरोपात जामीनावर असलेल्या (Accused Out On Bail Raped Old Lady) गुन्हेगाराने 75 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या नराधमाची 3 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपीवर यापूर्वीही बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल आहे (Accused Out On Bail Raped Old Lady).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धलाई जिल्ह्यात राहणारी एक 75 वर्षीय वृद्ध महिला घरात एकटी होती. महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत या नराधमाने बुधवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या वृद्धेने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची 3 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या गुन्हेगाराने 2017 मध्ये 56 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. त्याप्रकरणी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर आता तीन वर्षांनी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, जामीनावर सोडल्यावरही त्याने पुन्हा एकदा एका वृद्धेवर बलात्कार केला.

“या गुन्हेगारावर यापूर्वीही अनेक गंभीर आरोप आहेत, त्याचा जुना क्राईम रेकॉर्ड आहे”, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली.

याच महिन्याच्या सुरुवातीला त्रिपुराच्या उत्तरेकडील जिल्ह्यात एका 32 वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या 90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केला होता. त्याशिवाय त्रिपुराच्या उनाकोटी जिल्ह्यातील एका रुग्णालयात मंगळवारी 19 वर्षीय प्रशिक्षणार्थीचं अपहरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Accused Out On Bail Raped Old Lady

संबंधित बातम्या :

तीन वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांचा सामूहिक अत्याचार, दोघांनाही अटक

दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *