तीन वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांचा सामूहिक अत्याचार, दोघांनाही अटक

याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

तीन वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांचा सामूहिक अत्याचार, दोघांनाही अटक

मुंबई : मुंबईत अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. इथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर दोन अल्पवयीन (Three Year Old Girl Gangraped) मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. कस्तुरबा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक केली (Three Year Old Girl Gangraped).

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 12 नोव्हेंबरच्या रात्री तीन वर्षीय चिमुलीच्या गुप्तांगात जोरदार वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

याची माहिती मिळताच पालकांनी तात्काळ कस्तूरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तक्रारीनंतर कस्तुरबा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास केला. तपासात शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनीच 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.

हा धक्कादायक प्रकार संजय गांधी नॅशनल पार्क येथील आदिवासी पाड्यात घडला. पोलिसांनी या प्रकरणी कलम 376 (ग), पोक्सो अॅक्ट (4), (8) (12) नुसार गुन्हा दाखल करुन दोन्ही मुलांना बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे (Three Year Old Girl Gangraped).

22 वर्षीय तरुणीवरही सामूहिक बलात्कार, आरोपी फरार

मुंबईतच गँगरेपचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 22 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या 8 नोव्हेंबरला मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर एका हॉटेलमध्ये आरोपींनी तिला एका पार्टीत आमंत्रित केलं होतं. तिथ्या पोहोचल्यानंतर या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.

या आरोपींनी पीडितेला दारु पिण्यासाठी जबरदस्ती केली. पार्टी संपल्यानंतर जेव्हा तिच्यासोबतच्या इतर दोन महिला तेथून निघून गेल्या तेव्हा या तिघांनी पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप हे तीनही आरोपी फरार आहेत.

Three Year Old Girl Gangraped

संबंधित बातम्या :

हरयाणात 45 वर्षीय महिलेचा बलात्कार करुन गळा आवळला, पतीचा सावत्र मुलावर आरोप

दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *