नाशकात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या

सुट्टीवर घरी आलेला लष्करी जवान सुनील बावा याने पत्नी चैत्रालीची निर्घृण हत्या करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Nashik soldier Wife Murder, नाशकात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या

नाशिक : लष्करी जवानाने पत्नीची निर्घृण हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. घरगुती भांडणातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. (Nashik soldier Wife Murder)

लष्करात जवान असलेला सुनील बावा मूळ नाशिकचा रहिवासी आहे. सुनील दहा दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला होता. यावेळी सुनील आणि त्याची पत्नी चैत्राली बावा यांच्यामध्ये काही कारणांवरुन कुरबुरी सुरु झाल्या.

सुनील आणि चैत्राली यांच्यातील कुरबुरीचं पर्यवसान मोठ्या वादात झालं. रागाच्या भरात सुनीलने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर सुनीलचा जीव वाचला.

दरम्यान सुनील हा सातत्याने आपल्या मुलीला माहेरुन पैसे आणण्यासाठी छळत होता, अशी तक्रार मयत चैत्रालीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी सुनीलवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

दहा दिवसांच्या सुट्टीवर आलं असताना लष्करी जवानाने पत्नीची हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Nashik soldier Wife Murder)

हेही वाचा – लग्नाच्या हॉलवर चिमुकलीचा विनयभंग, सफाई कर्मचारी ताब्यात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *