पालघरमध्ये हॉटेलबाहेर बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न, भाजी विक्रेत्यामुळे महिलेला बेड्या

विशेष म्हणजे त्या बाळानेही त्या भाजी विक्रेत्याला पाहून त्याच्याकडे धाव घेतली. (Palghar baby Kidnapped by women get arrest)

पालघरमध्ये हॉटेलबाहेर बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न, भाजी विक्रेत्यामुळे महिलेला बेड्या
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 4:21 PM

पालघर : अडीच वर्षीय लहान बाळाचे अपहरण करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका स्थानिक भाजी विक्रेत्यामुळे पालघर पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. (Palghar baby Kidnapped by women get arrest)

पालघरमधील माहिम रोडवरील साई रेसिडेन्सी हॉटेलमध्ये निरज वर्मा नावाचा एक कर्मचारी काम करतो. तो आपल्या पत्नी आणि अडीच वर्षाच्या लहान बाळासह हॉटेलमध्येच वास्तव्यास होता. सोमवारी हे लहान बाळ हॉटेलबाहेरील आवारात खेळ होते. त्याच वेळी अचानक एका महिलेने त्याला फूस लावत त्याचे अपहरण केले.

काही वेळानंतर नीरज आणि त्याची पत्नी बाळाला बघण्यासाठी आली. मात्र तो लहान मुलगा तिला त्या आवारात दिसला नाही. त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोने त्याची शोधा शोध सुरु केली. मात्र त्याचा काही पत्ता लागत नव्हता.

दरम्यान, हॉटेलच्या आवारात भाजी विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला ही महिला मनोर महामार्गाजवळील क्रिस्टल पार्क परिसरात बाळासह दिसली. विशेष म्हणजे त्या बाळानेही त्या भाजी विक्रेत्याला पाहून त्याच्याकडे धाव घेतली.

त्यानंतर त्या भाजी विक्रेत्याने त्या महिलेकडे विचारणा केली असता, ती बनाव करु लागली. मात्र त्यावेळी तिला त्या ठिकाणच्या नागरिकांनी पकडून ठेवले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेला अटक केली. तसेच त्या बाळाला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. याबाबत अपहरण केल्याप्रकरणी पौर्णिमा मोरे या महिलेवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच भाजी विक्रेत्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Palghar baby Kidnapped by women get arrest)

संबंधित बातम्या : 

वर्ध्यात सोनसाखळी चोरांचा हैदोस, अंगणात झाडू मारणाऱ्या आजींची सोनसाखळी लांबवली

वडिलांच्या पीएफच्या पैशाचा वाद, मुलांकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.