अमरावतीत हत्येता थरार, घरात घुसून युवकावर चाकू हल्ला

चार नराधमांनी दिवाढवळ्या घरात घुसून एका 25 वर्षीय युवकाची त्याच्या कुटुंबियांसमोर हत्या केली (Tiosa youth murder case).

अमरावतीत हत्येता थरार, घरात घुसून युवकावर चाकू हल्ला

अमरावती : अमरावतीच्या तिवसा येथील आंबेडकर चौक परिसरात एक थरारक घटना घडली (Tiosa youth murder case). चार नराधमांनी दिवाढवळ्या घरात घुसून एका 25 वर्षीय युवकाची त्याच्या कुटुंबियांसमोर हत्या केली. ही घटना रविवारी (9 ऑगस्ट) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमरास घडली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण होते. युवकाच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले (Tiosa youth murder case).

अजय बाबाराव दलाल असं मृतक युवकाचे नाव आहे. अजय रेतीचा व्यवसाय करायचा. तो रविवारी दुपारी त्याच्या घरी कुटुंबियांसोबत होता. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याच्या घराबाहेर तीन चारचाकी गाड्या आल्या. या गाड्यांमधील चार जण अजयच्या घरात शिरले. त्यांनी अजयच्या घरच्यांना बंदूक दाखवत बाजूला केलं. त्यानंतर अजयच्या मांडीवर सपासप वार केला. त्यांनी अजयला गंभीर जखमी केलं. त्यानंतर अजयच्या मांडीवर चाकू तसाच सोडून ते पळून गेले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अजयवर हल्ला करणाऱ्या आरोपींनी त्याच्या कुटुंबियांना बंदूक दाखवत आडवे येऊ नका, असं सांगितलं. यावेळी अजयच्या आई-वडिलांनी आरोपींनी हटकले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. मात्र, आरोपी पळ काढण्यात यशस्वी ठरले. आरोपी अमरावती-नागपूर महामार्गाने पळून गेले.

अजय रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्याला उपचारासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला. या घटनेची तिवसा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *