लॉकडाऊनपूर्वी पळवलेली अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांनी सापडली, 26 वर्षीय तरुणाला अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास खोळंबला.

लॉकडाऊनपूर्वी पळवलेली अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांनी सापडली, 26 वर्षीय तरुणाला अटक

वर्धा : आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला (Wardha Minor Kidnapping And Molestation) अखेर तीन महिन्यांनी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आर्वीतील जनता नगर येथून 17 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेलं होतं. तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांना या मुलीचा शोध लावण्यात यश आलं आहे. यादरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचीही माहिती आहे. याप्रकरणी 26 वर्षीय दीपेश हिम्मत गोरडे याला अटक करण्यात आली आहे (Wardha Minor Kidnapping And Molestation).

मार्च महिन्यात 11 तारखेला जनता नगर येथून दीपेश हिम्मत गोरडे याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं होतं. त्यानंतर या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. त्याचा तपाससही सुरु झाला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास खोळंबला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन त्या कामात अडकून पडले.

मात्र, अखेर तीन महिन्यांनी पोलिसांना दीपेश हिम्मत गोरडे याची माहिती मिळाली. दीपेश नागपुरात राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करत दीपेशला अटक केली आणि पीडित अल्पवयीन मुलीला त्याच्या जाळ्यातून सोडवलं.

त्यानंतर अल्पवयीन मुलीची आरोग्य तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं कळालं. या प्रकरणी पोलिसांनी दीपेश गोरडेविरोधात गुन्हा दाखल केला असून मुलीला तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे.

Wardha Minor Kidnapping And Molestation

संबंधित बातम्या :

Jalgaon Suicide | मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याची आत्महत्या, कॉलेजसमोरच्या विहिरीत उडी

Jalgaon Murder | मुक्ताईनगरमध्ये माजी सभापतींची गळा चिरुन हत्या

तोंडाला चिकटटेप, हात पाय दोरीने बांधलेले, विरारमध्ये नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Nagpur Crime | नागपुरात गुन्हेगारी थांबेना, गुंडांकडून गुंडाचं अपहरण, दगडाने ठेचून हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *