मतदानानंतर 48, मतमोजणीआधी 55 जागांचा विश्वास, मनोज तिवारींना ‘भाजप’वर जबरा कॉन्फिडन्स

आम्ही आज दिल्लीत सत्तेवर येणार आहोत. आम्ही 55 जागा जिंकल्यास आश्चर्यचकित होऊ नका' असं मनोज तिवारी म्हणाले.

मतदानानंतर 48, मतमोजणीआधी 55 जागांचा विश्वास, मनोज तिवारींना 'भाजप'वर जबरा कॉन्फिडन्स
Follow us
| Updated on: Feb 11, 2020 | 8:43 AM

नवी दिल्ली : आम्हीच दिल्लीत सत्तेवर येणार, आम्हाला 55 जागा मिळाल्या, तरी चकित होऊ नका, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी व्यक्त केली आहे. आधी 48 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या मनोज तिवारींचा आत्मविश्वास मतमोजणीच्या दिवशी दुणावलेला (Manoj Tiwari Delhi Election Result) दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत.

‘मी चिंताग्रस्त नाही. मला खात्री आहे की, भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल. आम्ही आज दिल्लीत सत्तेवर येणार आहोत. आम्ही 55 जागा जिंकल्यास आश्चर्यचकित होऊ नका’ असं मनोज तिवारी माध्यमांना म्हणाले.

‘एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरतील. भाजपला 48 जागा मिळणार असून माझं ट्विट सेव्ह करुन ठेवा, कृपा करुन आतापासून ईव्हीएमला दोष देण्याचा बहाणा शोधू नका’ असं ट्वीट मनोज तिवारी यांनी मतदानाच्या दिवशी झालेल्या एक्झिट पोलनंतर केलं होतं.

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी शनिवार 8 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. यावेळी 62.59 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर एकूण 672 उमेदवार रिंगणात आहेत.

दिल्ली काबीज करण्यासाठी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या त्रिकूटाचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

भाजपने तीनशे खासदारांसह 11 राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरली होती. वीस वर्षांपासून सत्तेबाहेर असलेलं भाजप सत्ता मिळवण्यासाठी आसुसलं आहे. 2015 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजप-काँग्रेसला क्लीन स्वीप दिला होता. भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

Manoj Tiwari Delhi Election Result

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.