Delhi Election Results 2020: दिल्ली ‘आप’ली, केजरीवालांनी सत्ता राखली!

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी शनिवार 8 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. 62.59 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

Delhi Election Results 2020: दिल्ली 'आप'ली, केजरीवालांनी सत्ता राखली!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळवत ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabha Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. (Delhi Vidhansabha Election Result)

भाजपला केवळ 08 जागांवरच आघाडी घेता आली, तर काँग्रेसला पुन्हा एकदा शून्यावरच समाधान मानावं लागलं. अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. मात्र उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शेवटच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला.

या निवडणुकीत भाजपने जोरदार ताकद लावली होती. 70 जागांसाठी भाजपचे देशभरातील शेकडो खासदार दिल्लीत तळ ठोकून होते. याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचा ताफाही दिल्लीत कार्यरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या अनेक सभा झाल्या. पण तरीही भाजपला दिल्लीची सत्ता खेचून आणण्यात यश आलं नाही.

‘भाजपची प्रगती’

दरम्यान, या निकालाचं विश्लेषण करताना, भाजप आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि आपची अधोगती आणि भाजपची प्रगती असं म्हटलं. “आम्हाला मिळालेल्या जागा, समाधानकारक आहेत. मतांची टक्केवारी वाढली आहे. भाजपच्या जागा 3 वरुन 13 झाल्या, म्हणजे भाजपच्या कामगिरीत सुधारणा झाली”, असं शेलार म्हणाले. काँग्रेसचा सुपडासाफ झाला, आपची मतं घटली, भाजपची वाढ झाली, मतांची टक्केवारीही वाढली, असं शेलारांनी सांगितलं.

LIVE UPDATE

दिल्ली विधानसभेचा पहिला निकाल जाहीर, सीलमपूर विधानसभेत ‘आप’चे उमेदवार अब्दुल रहमान विजयी  

[svt-event title=”#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल” date=”11/02/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ] #ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70) LIVE – आप – 62 भाजप – 08 काँग्रेस – 00 [/svt-event]

#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70) LIVE –

आप – 63
भाजप – 07
काँग्रेस – 00

#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70) LIVE –

?आप – 58
?भाजप – 12
?काँग्रेस – 00

[svt-event title=”दिल्ली विधानसभा निकाल LIVE” date=”11/02/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आमच्या जागा 6 पटींपेक्षा जास्त वाढल्या : सुधीर मुनगंटीवार” date=”11/02/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

*#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70) LIVE* –

?आप – 53
?भाजप – 17
?काँग्रेस – 01

#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70) LIVE –
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर
 
?आप – 51
?भाजप -19
?काँग्रेस – 00
#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70)
  • आप – 53
  • भाजप – 17
  • काँग्रेस – 00

#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70)

  • आप – 53
  • भाजप – 16
  • काँग्रेस – 01

दिल्ली निकाल – आतापर्यंतचे कल
1) दिल्लीकरांची पुन्हा केजरीवालांना साथ, 56 जागांवर आघाडी
2) अरविंद केजरीवालांची हॅटट्रिक जवळपास निश्चित
3) दिल्लीवर तिसऱ्यांदा ‘आप’चा झेंडा
4) भाजपला 15 ते 20 दरम्यानच जागा मिळण्याची चिन्हं
5) काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ

#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70)
आप – 52

भाजप – 17

काँग्रेस – 01

#ResultsWithTV9 | दिल्ली विधानसभा निकाल (70) LIVE –
आप – 44
भाजप – 16
काँग्रेस – 02

[svt-event title=”आपने बहुमताचा आकडा गाठला, 36 जागांवर आघाडी” date=”11/02/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘आप’चाच विजय, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना विश्वास” date=”11/02/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘आप’ बहुमताच्या जवळ” date=”11/02/2020,8:16AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आपची घोडदौड सुरुच, बहुमताकडे वाटचाल” date=”11/02/2020,8:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आप 17, भाजप 07 जागांवर आघाडीवर” date=”11/02/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली विधानसभा निवडणुकांचा पहिला कल” date=”11/02/2020,8:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मतमोजणीला सुरुवात” date=”11/02/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी शनिवार 8 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. यावेळी 62.59 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर एकूण 672 उमेदवार रिंगणात आहेत.

दिल्ली काबीज करण्यासाठी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या त्रिकूटाचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

भाजपने तीनशे खासदारांसह 11 राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उतरवलं होतं. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरली होती. वीस वर्षांपासून सत्तेबाहेर असलेलं भाजप सत्ता मिळवण्यासाठी आसुसलं आहे. 2015 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजप-काँग्रेसला क्लीन स्वीप दिला होता. भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबागमध्ये झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सुरुवातीला ‘आप’चं पारडं जड मानलं जात असलं, तरी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपही ‘हम किसी से कम नहीं’च्या जोशात दिसला. काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात असली, तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराप्रमाणेच दिल्लीतही पक्ष निष्प्रभ ठरताना दिसत आहे. त्यामुळे खरी लढाई आप विरुद्ध भाजपच मानली जाते.

एक्झिट पोलचे निकाल

‘टीव्ही9 मराठी-सिसेरो’ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये दिल्लीत तिसऱ्यांदा ‘आम आदमी पक्षा’चंच सरकार येणार असल्याचं दिसत आहे. ‘आप’ला 54, भाजपला 15 तर काँग्रेसला 01 जागा मिळण्याची शक्यता ‘टीव्ही9 मराठी-सिसेरो’च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. बहुतांश एक्झिट पोलनुसार दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चं सरकार येण्याची शक्यता (Delhi Vidhansabhe Election Result) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI