11th Admissions: आजपासून पसंतीक्रमांक अर्ज भरता येणार! विद्यार्थ्यांना नो युअर एलिजिबीलीटी हा पर्याय उपलब्ध

रचना भोंडवे, Tv9 मराठी

Updated on: Jul 22, 2022 | 9:01 AM

10 महाविद्यालय निवडता येणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयाचे दहा पसंतीक्रम भरता येणार आहे. याचदरम्यान नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्जाचा भाग 1 ही भरता येणार आहे.

11th Admissions: आजपासून पसंतीक्रमांक अर्ज भरता येणार! विद्यार्थ्यांना नो युअर एलिजिबीलीटी हा पर्याय उपलब्ध
11th Admission
Image Credit source: Social Media

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 17 जूनला दहावीचा निकाल (SSC Results) जाहीर करण्यात आला होता. परंतु सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर न झाल्यामुळे हे विद्यार्थी तब्बल एक महिना अकरावी प्रवेशाचा अर्जाचा भाग 1 भरून, भाग 2 ची प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. रविवारी आयसीएसई (ICSE) चा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण संचालनालयामार्फत अर्ज भाग-2 ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेची घोषणा केली आहे.अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या (11th Online admission) अर्जाचा भाग 2 आजपासून (22 जुलै) भरता येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करून अर्जाचा भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी महाविद्यालय पसंतीक्रम भरावा लागणार आहे. 10 महाविद्यालय निवडता येणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयाचे दहा पसंतीक्रम भरता येणार आहे. याचदरम्यान नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्जाचा भाग 1 ही भरता येणार आहे.

 नो युअर इलिजिबीलीटी

गतवर्षीचा कटऑफ आणि प्रवेशाचा अंदाज अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयांचा गेल्यावर्षीचा कटऑफ देण्यात आला आहे. त्याचबरोबर नो युअर इलिजिबीलीटी हा पर्यायही उपलब्ध केला आहे. यामध्ये दहावीतील गुण, आरक्षण, शाखा, माध्यम, पत्ता ही माहिती भरून कोणत्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र आहे याची माहिती घेता येणार आहे. कॉलेजची कटऑफ पाहून विद्यार्थ्यांनी कोणते महाविद्यालय प्राधान्यक्रम निवडायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. या पर्यायामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालय निवडणे आणि त्यांचे पसंतीक्रम भरणे यासाठी विशेष मदत होणार आहे. पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास त्या महाविद्यालयात त्या यादीत अनिवार्य आहे. कारण पुढच्या नियमित फेन्यातून असे विद्यार्थी बाद होतात. दोन ते दहा पसंतीक्रम महाविद्यालय मिळाल्यास, आपला प्रवेश आपण घ्यायचा किंवा नाही हे ठरवू शकता. असे विद्यार्थी पुढच्या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरतात. दुसऱ्या किंवा त्याच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्याला आधी दिलेले पसंतीक्रम बदलता येऊ शकतात. बदल न केल्यास पूर्वी दिलेले पसंतीक्रमावर आधारित प्रवेश दिला जातो याची नोंद विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.

 विचारपूर्वक निर्णय घेवून अर्ज करावे

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानंतरच प्रवेश फेऱ्या राबविल्या जाणार आहेत. तसेच कोटा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षीच्या कटऑफ नुसार महाविद्यालय पसंतीक्रम निवडताना विचारपूर्वक निर्णय घेवून अर्ज करावे लागणार आहेत.

महाविद्यालय निवडताना

  • गतवर्षीचे कटऑफ गुण. ज्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही याचा अंदाज बांधता येतो.
  • आपण राहतो तेथून विद्यार्थ्यांनी निवडणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे अंतर व वाहतूक कालावधी व सोय पहावी.
  • कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित / विनाअनुदानित/ सेल्फ फायनान्स यापैकी कोणते आहे. हे विद्यार्थ्यांनी पहावे. विनाअनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क अधिक असते.
  • आपल्याला हवे असलेले विषय त्या महाविद्यालयात आहेत का ? उदा. बायफोकल किंवा भाषा (जर्मन/फ्रेंच) किंवा गणित, जीवशास्त्र.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI