Akola : वादळी वाऱ्याने शाळेचे छत उडाले, बकाल शाळेत विद्यार्थ्यांचे वर्ग; प्रशासनाचे दुर्लक्ष

Education News : एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची बकाल अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Akola : वादळी वाऱ्याने शाळेचे छत उडाले, बकाल शाळेत विद्यार्थ्यांचे वर्ग; प्रशासनाचे दुर्लक्ष
Akola : वादळी वाऱ्याने शाळेचे छत उडाले, बकाल शाळेत विद्यार्थ्यांचे वर्ग; प्रशासनाचे दुर्लक्ष Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 12:00 PM

अकोला – अकोला (Akola) जिल्ह्यातल्या बाळापूर (Balapur) तालुक्यातील रिधोरा येथे वादळी पावसाने शाळेची (School) पडझड झाली आहे. 28 डिसेंबर 2021 ला वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत शाळेची दुरुस्तीकरुन छत बसवण्यात आले नाही. तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहेत. शाळेवरील पत्रे उडाल्याने शाळेला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक आणी शाळा समितीने जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही समस्या दूर झाली खंत व्यक्त केली आहे.

काल शाळेतच विद्यार्थांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत

एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची बकाल अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने अशा बकाल शाळेतच विद्यार्थांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील रिधोरा गावातील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे सहा महिन्यापूर्वी वादळी पावसात उडूण गेले होते. तरी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची डागडूजी आवश्यक होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी छत नसलेल्या शाळेच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.

शाळेवरील कोसळलेल्या छताखाली विद्यार्थांना बसावे लागतं आहे

जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावात 125 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा आहे. ही शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. 228 इतकी शाळेची पटसंख्या आहे. तर उन्हाळी सुट्ट्या, आणि कोरोनामुळे यंदा शाळा उशीराने सुरू झाल्या आहेत. उत्साही वातावरणात विद्यार्थी शाळेत आले, मात्र शाळेवरील कोसळलेल्या छताखाली विद्यार्थांना बसावे लागले आहे. तर 28 डिसेंबर 2021 ला वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले असले तरी तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्तीकरुन छत बसवण्यात आले नाही. तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहे. तरी याबाबत शाळा समितीने वारंवार जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही आतापर्यंत समस्या दूर झाल्या नसून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप गावातील पोलीस पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरात लवकर शाळेची डागडुजी करुन गळती थांबविण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.