AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC Exam : बारावीच्या परीक्षा तोंडावर, प्रलंबित मागण्यांसाठी शाळा देण्यास नकार, शिक्षण संस्थांचा बहिष्काराचा इशारा, नेमकं काय घडणार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळकडून दहावी बारावी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकायचा की नाही ? यासंदर्भात उद्या निर्णय घेणार आहे.

HSC Exam : बारावीच्या परीक्षा तोंडावर, प्रलंबित मागण्यांसाठी शाळा देण्यास नकार, शिक्षण संस्थांचा बहिष्काराचा इशारा, नेमकं काय घडणार?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 9:50 PM
Share

मुंबई: कोरोना (Corona) विषाणू संसर्गाचं सावट दूर होत असून आता 4 मार्चपासून बारावीच्या (HSC) परीक्षा सुरु होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे दहावी (SSC) आणि बारावीच्या परीक्षांवर मोठं संकट निर्माण झालंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळकडून दहावी बारावी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकायचा की नाही ? यासंदर्भात उद्या निर्णय घेणार आहे. बारावी बोर्ड परीक्षा ही 4 मार्च पासून सुरु होत असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळकडून दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांवरील बहिष्कारा संदर्भातील इशारा देण्यात आला आहे. राज्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत बैठक घेऊन उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं यापूर्वी देखील राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.

शिक्षण संस्थांच्या मागण्या काय?

वेतनेतर अनुदान मिळावं,पवित्र पोर्टल रद्द करावे, अशा मागण्यांसाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दहावी बारावी बोर्ड परीक्षेला आपल्या शाळा सेंटर म्हणून देण्यास नकार देत बहिष्काराचा इशारा दिला आहे.त्यानंतर आज महामंडळ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन या मागणी संदर्भात तातडीने विचार करावा, अशी विनंती केली. पवारांच्या भेटीनंतर या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या संघटनेची सर्व विभागातील शिक्षकांसोबत बैठक होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय गव्हाणे यांनी सांगितलं आहे.

निर्णय घ्यावा लागणार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बोर्डाच्या 10 वी 12 च्या परीक्षांना शाळेच्या इमारती देण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडाळचा नकार दिलाय. आता परीक्षा एका दिवसावर आली असताना राज्य सरकारला शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या मन्य कराव्या लागतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. राज्य सरकार यामधून नेमका काय मार्ग काढते हे पाहावं लागणार आहे.

4 मार्चपासून बारावीच्या परीक्षा सुरु

कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. आता कोरोना विषाणू, ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेचं सावट दूर होत आहे. त्यामुळं राज्य बोर्डानं निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाण बारावीच्या परीक्षा 4 मार्चला सुरु होतील. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.

इतर बातम्या: 

ग्रामीण महाराष्ट्रात चक्का जाम करु, कृषीपंपासाठी दिवसा वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींचा इशारा

दारुच्या नशेत नातुची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.