ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाला उरले काही तास, SMS द्वारे निकाल कसा पाहायचा?

आयसीएसईचा  निकाल (CISCE Result 2021) परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल. cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. तर, एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाला उरले काही तास, SMS द्वारे निकाल कसा पाहायचा?
ICSE ISC Result 2021

नवी दिल्ली: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) 10 वी व 12 वीचे निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर होणार आह आयसीएसईचे सचिव गॅरी अरथून यांनी शुक्रवारी ही माहिती दिली होती. अरथून म्हणाले की, “दहावी आणि बारावीचा निकाल आज दुपारी 3 वाजता जाहीर केले जातील. आयसीएसईचा  निकाल (CISCE Result 2021) परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल. cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. तर, एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

SMS द्वारे निकाल कसा पाहणार

द्यार्थी त्यांचा दहावीचा आणि बारावीचा निकाल एसएमएसद्वारे मिळवू शकतात. एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ICSE/ISC(Unique ID) लिहून 09248082883 या क्रमांकावर पाठवल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उपलब्ध होऊ शकेल.

कोणत्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार

आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचा निकाल cisce.org आणि results.cisce,org या आयसीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट द्यावी.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: रोल नंबर किंवा इतर सबमिट करा.
स्टेप 4 : यानंतर निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
स्टेप 5 : निकालाची प्रत सेव्ह करुन ठेवा किंवा प्रिंट आऊट घ्या

कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा रद्द

आयसीएसईनं कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. बोर्डाने पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचं ठरवलं आहे. अरथून म्हणाले की मागील वर्षांप्रमाणेच यंदा उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नाही कारण विद्यार्थ्यांना विहित पद्धतीने गुण देण्यात आले आहेत. तथापि, निकालात काही त्रुटी सल्यास त्या सुधारण्यासाठी शाळांकडे दाद मागता येणार आहे.

निकाल कसा जाहीर होणार?

सीआयएससीईनं विद्यार्थ्यांच्या 2015 पासून ते 2020 पर्यंतच्या गुणांचा आधार घेत निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. आयसीएसईनं 17 जून 2021 रोजी बारावीच्या निकालासंदर्भातील मूल्याकनाचं सूत्र जाहीर केलं होतं. निकालाचं सूत्र सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्याला मंजुरी दिली होती. तर, दहावीचा निकाल नववी आणि दहावीच्या अंतर्गत मू्ल्यमापनातील गुणांच्या आधारे सादर केला जाणार आहे.

इतर बातम्या:

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाचे दहावी बारावीचे निकाल आज जाहीर होणार, निकाल कुठे पाहायचा?

NIOS Results 2021: एनआयओएसकडून दहावीसह बारावीचा निकाल जाहीर, निकाल नेमका कुठं पाहायचा?

ICSE, ISC Result 2021 CISCE 10th 12th results live updates today at cisce.org know steps to check result via sms and website

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI