ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाचे दहावी बारावीचे निकाल आज जाहीर होणार, निकाल कुठे पाहायचा?

काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) 10 वी व 12 वीचे निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर होणार आहेत. आयसीएसईचे सचिव गॅरी अरथून यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाचे दहावी बारावीचे निकाल आज जाहीर होणार, निकाल कुठे पाहायचा?
फाईल फोटो

नवी दिल्ली: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) 10 वी व 12 वीचे निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर होणार आहेत. आयसीएसईचे सचिव गॅरी अरथून यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अरथून म्हणाले की, “दहावी आणि बारावीचे निकाल शनिवारी 24 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केले जातील. निकाल (CISCE Result 2021) परिषदेच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल.आयसीएसईच्या वेबसाईटवरील करिअर पोर्टलच्या माध्यमातून शाळांसाठी गुणतालिका उपलब्ध करुन देण्यात येईल. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून परिषदेच्या पोर्टलवर लॉग इन करून निकाल उपलब्ध होऊ शकतो. ”

आयसीएसईनं कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. बोर्डाने पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचं ठरवलं आहे. अरथून म्हणाले की मागील वर्षांप्रमाणेच यंदा उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नाही कारण विद्यार्थ्यांना विहित पद्धतीने गुण देण्यात आले आहेत. तथापि, निकालात काही त्रुटी सल्यास त्या सुधारण्यासाठी विवाद निराकरण प्रणाली ठेवली जाईल.

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट द्यावी.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: रोल नंबर किंवा इतर सबमिट करा.
स्टेप 4 : यानंतर निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
स्टेप 5 : निकालाची प्रत सेव्ह करुन ठेवा किंवा प्रिंट आऊट घ्या

निकालासंदर्भात अडचण असल्यास शाळांशी संपर्क साधा

आयसीएसई बोर्डाच्या अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना निकालाच्या संदर्भात काही हरकत असेल तर तो शाळेत लेखी अर्ज देऊ शकतो आणि कारणांसह त्याच्या आक्षेपांचे तपशीलवार स्पष्टीकरण देऊ शकतो.. अरथून म्हणाले, “शाळा अशा प्रकारच्या सर्व अर्जांचा आढावा घेतील. त्यानंतर त्या संदर्भात बोर्डाकडे पुढील पत्रव्यवहार करतील.

विद्यार्थ्यांचे आक्षेप दूर करण्यासाठी समिती
केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड आणि काऊन्सिल फॉर द इंडियन स्कलू सर्टिफिकेट एक्झामिनेशन यांच्याकडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाबद्दल काही आक्षेप असतील तर ते दूर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं या समितीकडून समाधान झालं नाही तर त्यांना बोर्डा द्वारे स्थापन करण्यात आलेल्या आणखी समितीकडे पाठवण्यात येईल.

इतर बातम्या:

IBPS RRB Clerk Admit Card 2021: आरआरबी लिपिक परीक्षा प्रवेश पत्र जारी, ‘या’ थेट लिंकवरून करा डाऊनलोड!

India Post Recruitment 2021: पोस्टामध्ये दहावी उत्तीर्ण उमदेवारांना मोठी संधी, 2357 पदांची भरती

ICSE, ISC Result 2021 CISCE 10th 12th results live updates today at cisce.org know steps to check

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI