JNVST Postponed: जवाहर नवोदय विद्यालय 6 वीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा स्थगित, पुन्हा परीक्षा कधी?

जवाहर नवोदय विद्यालय सहावीच्या वर्गासाठीची प्रवेश परीक्षेची तारीख नवीन तारीख जाहीर केली जाईल. Navodaya Vidyalaya JNVST Postpone

JNVST Postponed: जवाहर नवोदय विद्यालय 6 वीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा स्थगित, पुन्हा परीक्षा कधी?
Student
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 3:58 PM

JNVST Class 6 Exam Postponed नवी दिल्ली: जवाहर नवोदय विद्यालय समितीनं इयत्ता सहावीच्या वर्गासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकली आहे. JNVST प्रवेश परीक्षा मिझोरम, मेघालय आणि नागालँड वगळता इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 16 मे रोजी होणार होती. तर या तीन राज्यांमध्ये 19 जून 2021 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, प्रशासकीय कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवोदय विद्यालय समितीतकडून इयत्ता सहावीच्या वर्गासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. (Jawahar Navodaya Vidyalaya JNVST Class 6 Exam Postponed Check Details Here )

परीक्षेपूर्वी 15 दिवस तारीख जाहीर करणार

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवीन तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 15 दिवसांची मुदत मिळेल, असा वेळ ठेवून तारीख जाहीर होईल. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रशासकीय कारणांमुळं परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

परीक्षेचे स्वरुप

जेएनवी इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा इंग्रजी, हिंदी संबंधित राज्यातील प्रादेशिक भाषेत आयोजित केली जाते. प्रवेश परीक्षेचा वेळ दोन तासांचा असतो. यामध्ये तीन विभाग असतात आणि 80 वस्तूनिष्ट प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असते. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित परीक्षण आणि भाषा कौशल्य या विषयावर प्रश्न विचारले जातात.

प्रवेश परीक्षेनंतर पुढे काय?

JNVST इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरचं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित मानला जाईल. जवाहर नवोदय विद्यालयाची सहावीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा दुसऱ्यांदा स्थगित केली गेली आहे. यापूर्वी परीक्षा 10 एप्रिलला होणार होती. त्यानंतर 16 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्यानं तारीख जाहीर केली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

अकरावी प्रवेशसाठी सीईटी परीक्षा घ्यायची का? दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मत नोंदवण्याचं आवाहन

AICTE ने जारी केले शैक्षणिक कॅलेंडर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा आणि समुपदेशनाचा संपूर्ण तपशील

(Jawahar Navodaya Vidyalaya JNVST Class 6 Exam Postponed Check Details Here )

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.