AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board 10th Result 2024 : दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, सकाळी अकरा..

Maharashtra Board 10th Result 2024 Date : दहावीच्या निकालाची विद्यार्थी वाट पाहताना दिसत आहेत. दहावीचा निकाल कधी लागणार हे सातत्याने विद्यार्थ्यांकडून विचारले जातंय. राज्यभरात मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा पार पडल्या. विशेष म्हणजे यंदाही कॉपीमुक्त परीक्षा पार पडल्या.

Maharashtra Board 10th Result 2024 : दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, सकाळी अकरा..
10th Result
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 10:54 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीची परीक्षा घेण्यात आली. 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा झाली. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांमधील उत्सुकता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. निकाल कधी लागणार याबद्दल सातत्याने विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल लागले आहेत.

बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी लागला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी अत्यंत मोठी माहिती दिली होती. आज 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे अकरा वाजता पत्रकार परिषद घेतील. विशेष म्हणजे यंदाच्या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. निकालाच्या टक्केवारीमध्ये कोकण विभाग अव्वल ठरला तर सर्वाधिक कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला.

Maharashtra SSC RESULT

मुलींच्या टक्क्यात देखील मोठी वाढ झाली. छत्रपती संभाजी नगरच्या विद्यार्थींनीने बोर्डात शंभरपैकी शंभर टक्के मार्क मिळवले. बारावीच्या निकालात मुली मुलांपेक्षा वरचढ ठरल्या. आता दहावीच्या निकालात मुले बाजी मारतात की, मुली हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त पार पडल्या आहेत.

भरारी पथकांच्या संख्येत बार्डाकडून मोठी वाढ करण्यात आली. हेच नाही तर परीक्षा केंद्रावर बंदोबस्त वाढवला होता. यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का वाढणार असल्याचे सांगितले जातंय. पालकांसह विद्यार्थ्यांच्या नजरा या दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. आता दहावीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.