AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीत कमी मार्क मिळाले तरी निराश होऊ नका; ‘या’ क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी

Career Option After 12th : 12 वीला कमी मार्क मिळाले तर कोणत्या क्षेत्रात करिअर करावं? कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत? विद्यार्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी बातमी, कोणत्या क्षेत्रात काम करावं, करिअक कोणतं निवडावं या प्रश्नांची उत्तर, वाचा सविस्तर...

बारावीत कमी मार्क मिळाले तरी निराश होऊ नका; 'या' क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी
| Updated on: May 21, 2024 | 7:54 PM
Share

12 HSC Result 2024 Maharashtra Board : आज बारावीचा निकाल लागला आहे. 12 वी चा निकाल लागल्यानंतर आता पुढे काय करावं, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला तुमचं करिअर करता येईल? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असेल. काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले त्यामुळे त्यांच्या घरात आज आनंदाचं वातावरण आहे. तर काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याने ते नाराज झालेत. मात्र विद्यार्थ्यांनो, निराश होऊ नका, चिंता करू नका. ही बातमी 12 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठीच आहे. करिअरच्या संधी काय आहेत? कोणत्या क्षेत्रात करिअरच्या काय संधी आहेत? टक्के मिळाले असतील कर काय करावं? कमी गुण मिळाले असतील तरिही तुम्ही उत्तम करिअर करू शकता. त्यासाठी ही बातमी वाचा, तुमच्या जीवनाला दिशा मिळेल.

जर तुम्हाल 50% मार्क मिळाले असतील किंवा त्यापेक्षाही कमी गुण मिळाले असतील. तरी चिंता करू नका. कमी गुण असले तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. अनेक करिअर ऑप्शन्स सध्या उपलब्ध आहेत. जरा हटके फिल्ड निवडून तुम्ही तुमचं करिअर यशस्वी वाटेवर नेऊ शकता.

एअर होस्टेस किंवा केबिन क्रू

तुम्हाला दर लोकांशी संवाद साधायला आवडत असेल. तुमची पर्सनॅलिटी चार चौघात उठून दिसत असेल. तुमचं कम्युनिसेशल स्किल चांगलं असेल तर एअर होस्टेस किंवा केबिन क्रू हा चांगला पर्याय असू शकतो. यात तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये करिअर करता येईल. देशाअंतर्गत आणि परदेशात जाणाऱ्या विमानांमध्ये एअर होस्टेस किंवा केबिन क्रूचा जॉब तुम्हाला करता येईल.

इव्हेंट मॅनेजमेंट

साध्यातील साधा कार्यक्रम सध्या जोरात सेलिब्रेट करतात. त्यामुळे घरातील साधा कार्यक्रम ‘इव्हेंट’ होईन जातो. इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची सध्या तरूणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळते. इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा करू शकता. त्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. किंवा स्वत:चा बिझनेस उभा करू शकता.

फॅशन डिझायनिंग, परफॉर्मिंग आर्ट

फॅशन डिझायनिंग हा जरी आधीपासून चालत आलेला करिअर ऑप्शन असला तरी तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवू शकता. परफॉर्मिंग आर्ट हा देखील चांगला पर्याय आहे. परफॉर्मिंग आर्टचा कोर्स केल्यानंतर डान्ससोबतच थिएटरमध्येही तुम्ही करिअर करू शकता.

मीडिया

तुम्हाला जर लिखानाची आवड असेल. सामाजिक प्रश्नांची जाण असेल अन् लोकांचे प्रश्न सोडवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मीडिया या चांगला पर्याय आहे. फक्त ग्लॅमर न पाहता एक चांगल करिअर करण्याची इच्छा असेल. तर मीडिया हा चांगला पर्याय आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही आणि वेब मीडिया असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.