इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा; निकाल येईल लगेच हाती

Maharashtra Board 12th Results 2024 : आज बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार. नुकताच बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली. विभागानुसार निकालाची टक्केवारी ही बोर्डाकडून जाहीर करण्यात आलीये.

इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी 'ही' ट्रिक वापरा; निकाल येईल लगेच हाती
12th Result
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 1:06 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाची सविस्तर टक्केवारी दिलीये. हेच नाही तर दरवेळीप्रमाणे यंदा देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलीये. कोकण विभाग या निकालात अव्वल ठरलाय. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही https://www.tv9marathi.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन शकता. येथे आपल्याला निकाल मिळेल. यासाठी सर्वात सोपी ट्रिक आहे. पहिल्या चाैकोनात आपल्याला परीक्षा क्रमांक हा टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला आईचे नाव दुसऱ्या खालच्या चाैकोनात टाकावे लागेल. त्यानंतर सबमिटचे बटन दाबा.

Maharashtra HSC RESULT

सबमिटचे बटन दाबल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर निकाल असेल. या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता. यासोबतच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर देखील तुम्हाला पाहण्यास मिळेल. दुपारी बरोबर 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने.

राज्याचा एकून 93.37 टक्के निकाल लागला आहे. यंदा सर्वात जास्त निकाल हा कोकण विभागाचा लागला असून 97.51 टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून 91.95 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या असून मुलींचा निकाल 95.44 लागला असून मुलांचा निकाल 91.60 लागलाय.

मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत 3.84 टक्के जास्त आहे. 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला हे या निकालाचे वैशिष्ट आहे. विज्ञान विभागाचा निकाल 97.82 कला शाखा निकाल 85.88, वाणिज्य विभाग निकाल 92.18 लागलाय. अवघ्या काही वेळात विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे.

Non Stop LIVE Update
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.