AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC exams: राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर

HSC Board exams: प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे.

HSC exams: राज्यात आजपासून बारावीची परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर
| Updated on: Feb 11, 2025 | 8:01 AM
Share

HSC Board exams: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे.

यंदाही दहा मिनिटे वेळ अधिक मिळणार

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर विभागात बारावीचे १ लाख ५८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. २०१८ पासून जे गैरप्रकार घडले त्या केंद्रावरील केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई बदलले आहे. या केंद्रांवर तटस्थ शाळेचे स्टाफ नियुक्त करण्यात आले. यावर्षी परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल.

सर्व पेपर कस्टेडियनपर्यंत पोहचवले

बोर्डाकडून सर्व पेपर कस्टोडियनपर्यंत पोहचले आहे. ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी कस्टोडियन पोहचून लाईव्ह लोकेशन देणार आहे. धुळ्यात परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी 23 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे .धुळे जिल्ह्यातील परीक्षेसाठी 47 केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्यात 24 हजार 557 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यात 13 हजार 821 विद्यार्थी तर दहा हजार 738 विद्यार्थिनी आहेत.

संभाजीनगरात व्हिडिओ शूटिंग कॅमेऱ्याची करडी नजर

छत्रपती संभाजी नगर विभागात 1 लाख 85 हजार पेक्षा तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 63 हजार 918 परीक्षार्थी आज परीक्षा देणार आहे. जिल्ह्यातील 161 केंद्रावर ही परिक्षा पर पडेल. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. त्याचबरोबर 41 भरारी पथके तर 161 बैठी पथके आणि पोलीस कर्मचारी देखील तैनात राहणार आहे. परीक्षेदरम्यान केंद्रावर कॉफीचा अथवा काही गैरप्रकार आढळला तर त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार असल्याचा इशारा विभागीय मंडळांनी दिला आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.