राज्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून स्कूल चले हम,5 लाखांहून अधिक पालकांचा 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याकडे कौल

योगेश बोरसे

| Edited By: |

Updated on: Jul 14, 2021 | 1:14 PM

Maharashtra Government reopen school: आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी जवळपास 81 टक्के पालकांनी होकार दर्शविला आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून स्कूल चले हम,5 लाखांहून अधिक पालकांचा 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याकडे कौल
Solapur School feature

पुणे: राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये उद्यापासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी जवळपास 81 टक्के पालकांनी होकार दर्शविला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी ही माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.

81 टक्के पालकांचा शाळा सुरु करण्याकडं कल

कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांनी होकार दर्शवला आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर समोर आली आहे.

शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.

नियमांचं पालन करणं आवश्यक

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

1) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे; शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

Thermometer, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.

• एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.

. क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

2) शिक्षकांची कोविड-१९ बाबतची चाचणी: संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड- १९ साठीची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.

3) बैठक व्यवस्था : वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

इतर बातम्या:

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

भारतात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा, शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतूनच उघड

Maharashtra Government to reopen school and colleges Class 8th to 12th Offline classes tomorrow

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI