Maharashtra School Reopen : मोठी बातमी, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार, आरोग्य विभागाची परवानगी, राजेश टोपेंची माहिती

Maharashtra School Reopen Latest News and Update: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल.

Maharashtra School Reopen : मोठी बातमी, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार, आरोग्य विभागाची परवानगी, राजेश टोपेंची माहिती
राजेश टोपे, आरोग्य मंत्री.


मुंबई: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, असही राजेश टोपे म्हणाले.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं मत मांडलं आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याबाबत आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही. आरोग्य विभागाची पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास कोणतीही अडचण नसून यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेवावा

राज्यात सध्या 700-800 रुग्ण आढळून येत आहेत.  रुग्ण होण्याचा दर देखील चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावं. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

सध्या पाचवी पासून पुढील वर्ग सुरु आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत.  पहिली ते  चौथीचे वर्ग सुरु करावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. आता आरोग्य विभागानं देखील यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी  निर्णय घेतल्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत आदेश जारी केली जातील, असं राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात तिसरी लाट सौम्य

महाराष्ट्रात तिसरी लाट सौम्य स्वरुपाची शक्यता आहे, असं राजेश टोपे म्हणाले. बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थी संसर्गित झाला तर तो त्याच्या आजी आणि आजोबांना संसर्गित करु शकतो त्यामुळं  या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असं राजेश टोपे म्हणाले.


इतर बातम्या:

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला! कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

खरीप, भातशेतीनंतर आता फळबागांना अवकाळीचा फटका, सिंधुदुर्गात फळ बागायतदार अडचणीत, काय आहे उपाययोजना?

मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती?; सोशल मीडियावर चर्चा आणि तर्कांचा पूर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI