NEET SS 2021: नीट सुपरस्पेशालिटी परीक्षा लांबणीवर,जानेवारीत परीक्षेचं आयोजन, सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर निर्णय

NEET SS 2021: नीट सुपरस्पेशालिटी परीक्षा लांबणीवर,जानेवारीत परीक्षेचं आयोजन, सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर निर्णय
Exam

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनआणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षा पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्यानं फटकारलं होतं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Oct 04, 2021 | 4:19 PM

NEET SS 2021 नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनआणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 च्या परीक्षा पॅटर्नमध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्यानं फटकारलं होतं. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशननं नीट एसएस परीक्षेसंदर्भात नवी माहिती दिली आहे. नीट सुपर स्पेशालिटी परीक्षा नोव्हेंबर ऐवजी जानेवारी महिन्यात होणार आहे.

सुप्रीम कोर्टानं NBE सह केंद्र सरकारला फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘सत्तेच्या खेळात या तरुण डॉक्टरांना फुटबॉल समजू नका. आम्ही या डॉक्टरांना असंवेदनशील नोकरशहांच्या दयेवर सोडू शकत नाही. सरकारने त्यांची समस्या स्वत: सोडवावी. जर तुमच्या हातात अधिकार असेल तर तुम्ही त्याचा कोणत्याही प्रकारे वापर करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. डॉक्टरांच्या कारकिर्दीसाठी नीट एस एस परीक्षा खूप महत्वाची आहे. आता तुम्ही शेवटच्या क्षणी त्यामध्ये बदल करु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं सुनावलं होतं.

नीट एस एस परीक्षा का घेतली जाते?

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन एनबीईकडून नीट एस एस परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरु कण्यात आली आहे. नीट एस एस परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना natboard.edu.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. nbe.edu.in या वेबसाईटवर माहिती पत्रक जारी करण्यात आलं विद्यार्थ्यांनी ते वाचून घेणं आवश्यक आहे. NEET SS 2021 परीक्षा DM / MCh आणि DrNB SS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केले जाते. NEET-SS ही प्रवेशासाठीची पात्रता आणि रँकिंग परीक्षा आहे. डीएएम, एमसीएच आणि डीआरएनबीएसएस मधील सुपरस्पेशालिटी प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाते.

आता परीक्षा जानेवारीमध्ये होणार

NBEMS द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिसनुसार नीट एस एस परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येणार होती. आता नीट परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्यांनी पुढील अपडेट साठी एनबीईच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

 

Neet ss exam 2021 nbe  decided to postpone neet ss exam to January after hearing in  supreme court

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें