AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शालेय फीच्या मुद्यासाठी पालक संघटना सुप्रीम कोर्टात, राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याची भावना

कोरोना कालावधीत मागील शैक्षणिक वर्षीची फी कमी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय व राज्य शासन यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

शालेय फीच्या मुद्यासाठी पालक संघटना सुप्रीम कोर्टात,  राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याची भावना
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 1:21 PM
Share

पुणे: शालेय फी च्या मुद्यावर पुण्यातील पालक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरोना कालावधीत मागील शैक्षणिक वर्षीची फी कमी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय व राज्य शासन यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेचे मुख्य वकील ॲड.मयंक क्षीरसागर असून त्यांना ॲड.पंखुडी गुप्ता व ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा हे सहाय्य करणार आहेत.

किती पालकांनी याचिका केली?

कोरोना काळातील फीच्या मुद्यावर 15 पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार या वर्षी पालकांना दिलासा देण्यासाठी आदेश आणण्याची बतावणी करत असले तरी मागील वर्षाचे शुल्कवाढीबाबत त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, असं मत पालकांनी व्यक्त केलं आहे.

याचिका का दाखल केली?

राज्य सरकारनं शालेय शिक्षणाच्या फी संदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला. राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्यानं ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून 32 शाळांना नोटीस

शालेय शिक्षणाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थींना शाळेत बसू न देणार्‍या राज्यातील 32 शाळांना नोटीस शिक्षण विभागानं दिली आहे. मुंबई, नवी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, नागपूर विभागातील शाळांना नोटीस दिली आहे. यात मुंबई, नवी मुंबईतील 10, पुणे येथील 10 , नाशिकमधील 5 , नागपूरमधील 5 आणि औरंगाबादमधील 2 शाळांना नोटीस देण्यात आली आहे. फी न भरलेल्या विद्यार्थींना ऑनलाईन क्लासला बसू न देणं, काही विद्यार्थींना शाळेतून काढून टाकण्याचे प्रकार करणार्‍या शाळांना मान्यता रद्द करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

आरटीआय कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई

कोरोना काळात कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ करू नये, असे स्पष्ट आदेश असताना देखील मुंबई, नवी मुंबईतील शाळांनी फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावणे, विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे यासह शिक्षण अधिकार अधिनियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 शाळांवर अखेर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आला असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोली मध्ये पत्रकारांशी  बोलताना  दिली होती.

इतर बातम्या

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर : वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad | राज्यात शिक्षण सेवकांसाठी मेगाभरती, शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती

(Parents association file petition at supreme court over the issue of school fee)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.