TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यातील सुशील खोडवेकरमुळं IAS आणि IPS वादाची शक्यता, 7800 शिक्षकांवर कारवाई?

शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam Scam) गैरप्रकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उपसचिव सुशील खोडवेकरला (Sushil Khodawekar) वाचवण्यासाठी मंत्रालयात फिल्डिंग सुरू झाल्याची चर्चा रंगलीय.

TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यातील सुशील खोडवेकरमुळं IAS आणि IPS वादाची शक्यता, 7800 शिक्षकांवर कारवाई?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 9:36 AM

पुणे: शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam Scam) गैरप्रकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उपसचिव सुशील खोडवेकरला (Sushil Khodawekar) वाचवण्यासाठी मंत्रालयात फिल्डिंग सुरू झाल्याची चर्चा रंगलीय. यानिमित्ताने आयएएस अधिकारी विरुद्ध आयपीएस अधिकारी असा वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) दोन दिवसापूर्वी सुशील खोडवेकरला टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक केली होती. आज सुशील खोडवेकरला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आरोग्य भरती प्रकरणाचा तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे हाती लागले होते. त्यानंतर रितेश देशमुख आणि तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. रितेश देशमुख आणि तुकाराम सुपे यांनी डोंगरेमार्फत खोडवेकरला पैसे दिल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. तर, दुसरीकडे राज्यात 7 हजार 800 शिक्षकांनी बोगस पद्धतीने टीईटी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवले हे देखील तपासात स्पष्ट झाल्याने त्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे देखील समोर आलं आहे.

सुशील खोडवेकर वरुन आयएएस आणि आयपीएस वादाची शक्यता

शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) घोटाळ्यात अटक केलेल्या सचिव सुशील खोडवेकरला वाचवण्यासाठी मंत्रालयात फिल्डिंग सुरू झाल्याची चर्चा रगंलीय. यामुळं आए एस विरुद्ध आयपीएस वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचं कळतंय. 31 जानेवारीपर्यंत सुशील खोडवेकरला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तुकाराम सुपे आणि प्रितिश देशमुख या़ंनी डोंगरेमार्फत खोडवेकरला पैसे दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.तर, काळ्या यादीत टाकलेल्या जी ए सॉफ्टवेअर या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी सुपेला सूचना केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पुणे पोलीस खोडवेकर याची कोठडी मागणार

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात ठाण्यातून खोडवेकरला सायबर पोलिसांनी अटक केली होती. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात खोडवेकर यांना हजर केलं जाणार आहे.

पैसे देऊन टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

पैसे देऊन टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी यादी दिल्यानंतर व अहवाल दिल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई होण्याची शक्यता, तर सेवेत नसलेल्या उमेदवारांचे निकाल रद्द केले जातील, असा इशारा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिला. 2019 -20 च्या टीईटी परीक्षेत 7 हजार 800 जण पैसे देऊन पास झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

इतर बातम्या:

TET Exam Scam | सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

TET Exam Scam| TET परीक्षेत पैसे देऊन 7 हजार 800 परीक्षार्थी पास, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर

Pune Cyber Police arrest Sushil Khodawekar IAS and IPS conflict may raised teachers will face action of suspension who did malpractice in exam

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.