सामाजिक कल्याणासाठी ‘सस्मिरा’ संस्थेचं ‘कर्तव्य’ उपक्रम; चंद्रकांत पाटील म्हणाले…

'सस्मिरा' संस्थेने आतापर्यंत सामाजिक कल्याणासाठी केली आहे जवळपास १५ लाख रुपयांपेक्षा अधिक मदत...; यामुळे चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

सामाजिक कल्याणासाठी 'सस्मिरा' संस्थेचं 'कर्तव्य' उपक्रम; चंद्रकांत पाटील म्हणाले...
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 9:48 AM

मुंबई : आज सामाजिक कल्याणासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. अशाच संस्थांपैकी एक म्हणजे सस्मिरा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च संस्था (SIMSR). गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था सामाजिक कल्याणासाठी कार्यरत आहे. सस्मीरा गेली अनेक वर्ष एका पेक्षा जास्त पदवीपूर्व, फॅशन आणि व्यवस्थापन शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. “कर्तव्य” हा सामाजिक उपक्रम राबवत संस्थेने अनेकांची मदत केली आहे. सास्मिरा महाविद्यालयाअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून “कर्तव्य” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आज अनेक ठिकाणी ‘कर्तव्य’ उपक्रमाच्या चर्चा असतात. ‘कर्तव्य’ उपक्रम ३ मार्च २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

“कर्तव्य” उपक्रमाअंतर्गत गेले अनेक वर्षे एकही रुपयाच्या नफ्याची अपेक्षा न करता संस्था फक्त आणि फक्त सामाजिक कल्याणासाठी राज्यातील अनेक सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत महाविद्यालयाने जवळपास १५ लाख रुपयांपेक्षा अधिक मदत केली आहे.

“कर्तव्य” उपक्रमासाठी अनेक सिनेकलावंत आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांनी विशेष उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमासाठी बिग बॉस फेम गायत्री दातार, उर्मी संस्थेच्या अध्यक्षा सोनाली श्यामसुंदर आणि फॉर फ्युचर इंडिया चे संस्थापक हर्षद धागे यांची हजेरी लावली. शिवाय आलेल्या पाहुण्यांनी संस्थेला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छ देखील दिल्या.

एवढंच नाही तर, चला हवा येऊ द्या फेम अभिनेते भाऊ कदम, संदेश उपशाम आणि घुगे यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचं निमित्त साधत जवळपास ४० संस्थांनी त्यांचे स्टॉल्स महविद्यालयामधे लावले होते. अनेक दिव्यांग मुलांनी यात बहारदार सादरीकरण केले. मल्लखाम, गायन, वाद्य वादन याद्वारे त्यांच्यातील अनेक कला सादर करण्यासाठी त्यांना माध्यम लाभलं.

संस्थेला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘सर्वांनी ‘कर्तव्य’ उपक्रमाला सहकार्य केलं पाहिजे. कर्तव्याचा माध्यमातून समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि तेच या कार्यक्रमाचे फलित असेल असं मला वाटतं..’ सध्या “कर्तव्य” उपक्रमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.