EDUCATION NEWS : वार्षिक परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानूसार, अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या शाळांना एप्रिलपासून सुट्टी
दोन वर्षापुर्वी संसर्गजन्य कोरोना (Corona) भारतात सक्रीय झाला आणि विद्यार्थ्यांचं ऑफलाईन शिक्षण (Education) बंद झालं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा देखील झाल्या. दोन वर्षात महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात शाळा सुरू बंद असं चित्र होतं.

मुंबई – दोन वर्षापुर्वी संसर्गजन्य कोरोना (Corona) भारतात सक्रीय झाला आणि विद्यार्थ्यांचं ऑफलाईन शिक्षण (Education) बंद झालं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा देखील झाल्या. दोन वर्षात महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात शाळा सुरू बंद असं चित्र होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरते अशीही चर्चा होते. कोरोनाच्या काळात ज्या शाळांचा अभ्यासक्रम शिकवण्याचा अपुर्ण आहे अशा शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहणार आहेत. ज्या शाळांनी आपल्या अभ्यासक्रम पुर्ण केला आहे, अशा शाळांना एप्रिलपासून सुट्टी मिळणार आहे. अभ्याक्रम पुर्ण करणाऱ्या शाळांनी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुट्टी जाहीर करावी असं शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष ठरलेल्या वेळेत म्हणजे जूनच्या 15 तारखेपासून सुरू होणार आहे.
वार्षिक परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानूसार
मागच्या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या. परंतु आता विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रत्यक्ष परीक्षा द्यायच्या आहेत. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या तारखेनुसार परीक्षा होणार आहेत. अनेक शाळांमध्ये सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. बहुसंख्य शाळांच्या परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपतील. कोणत्याही शाळेने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे असल्याचे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
मे महिन्यात शाळा सुरू ठेवण्याच्या कोणत्याही सुचना नाही
कोरोनामुळे अनेक शाळांचा अभ्यासक्रम पुर्ण झालेला नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शाळांनी वेळेते अभ्यासक्रम पुर्ण केला आहे, अशा शाळा सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांना मे ते जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी सुट्टीची मजा घेता येईल. विशेष म्हणजे मे महिन्यात शाळा सुरू ठेवण्याच्या कोणत्याही सुचना नसल्याचे शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांनी सांगितले.
