AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरच्या सीईओंची भन्नाट आयडिया, शिक्षकांच्या साथीनं 600 हून अधिक गावात कट्ट्यावर ,पारावर ,झाडाखाली शाळा सुरु

ग्रामीण भागात कुठे रेंजची अडचण तर कुठे पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेले अँड्रॉइड मोबाईल्स ही नाहीत. त्यामुळे अशा विध्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मार्गात मोठा अडथळा येत होता.

सोलापूरच्या सीईओंची भन्नाट आयडिया, शिक्षकांच्या साथीनं 600 हून अधिक गावात कट्ट्यावर ,पारावर ,झाडाखाली शाळा सुरु
सोलापूरमध्ये पारावर शाळा सुरु
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 3:39 PM
Share

सोलापूर: कोरोना संसर्गामुळे राज्यात शाळा बंद आहेत, शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. ग्रामीण भागात कुठे रेंजची अडचण तर कुठे पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेले अँड्रॉइड मोबाईल्स ही नाहीत. त्यामुळे अशा विध्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मार्गात मोठा अडथळा येत होता. मात्र, म्हणतात ना शिक्षण घ्यायचे आणि द्यायचे म्हंटल तर कसं ही देता येते याचा प्रत्यय सोलापुरातील जिल्हा परिषेदेच्या शिक्षकांकडून पाहायला मिळतं आहे.

विद्यार्थ्यांपुढं मोबाईलची अडचण

सोलापुरात जिल्ह्यात आता रोज सकाळी असं चित्र पाहायला मिळेल,कधी झाडाखाली तर कधी पारावार तर कधी शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरु झाला आहे. आपण म्हणालं राज्यात शाळा बंद असताना सोलापुरात हे कसं काय सुरु आहे. होय हे शक्य झालं आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. विद्यार्थ्यांपुढील मोबाईलची अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्यावतीनं सर्वेक्षण करुन विद्यार्थ्यांची आरोग्य चाचणी करुन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी भाग्यलक्ष्मी निकम कडे अँड्राईड फोन नाही. सध्या कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांकडून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, भाग्यलक्ष्मी हिच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यां आणि कोरोनाच्या काळात कुठे मजुरी मिळत असल्याने बॅलन्ससाठीही पैसे नसल्यानं तिला शिक्षण घेता येत नव्हती ही भाग्यलक्ष्मी निकमची परिस्थिती आहे. तर याच गावातील स्नेहल जमादार हिची अडचण जरा वेगळी आहे. स्नेहलच्या वडिलांकडे मोबाईल आहे ,मात्र ते शहराच्या ठिकाणी सोबत मोबाईल कामाला घेऊन जात असल्यामुळे स्नेहलच्या अभ्यासाची मोठी अडचण निर्माण झाली होती. बर, असं असतानाही मात्र तिने अभ्यास काही सोडला नाही. स्वत:च्या जीवावर स्नेहलनं अभ्यास सुरु ठेवला. आनलाईन शिक्षणापासून दूर राहवं लागणारी भाग्यलक्ष्मी आणि स्नेहल ही प्रातिनिधिक उदाहरण आहेत. मात्र, जिल्हा परिषदेनं झाडाखाली, पारावर आणि कट्ट्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानं सोलापूरातील असंख्य भाग्यलक्ष्मी आणि स्नेहलची शिक्षणाची अडचण दूर झालीय. प्रत्यक्ष शिक्षकांकडून त्यांना शिकवलं जातंय.

जिल्ह्यात 78 हजार विद्यार्थ्यांकडे अँड्राईड मोबाईल नाही

ग्रामीण भागात कोरोना संसर्ग नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पेनेतून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 600 हून अधिक गावात चक्क झाडाखाली शाळा भरविल्या जात आहेत. ऑनलाईन शिक्षण दिले जात असले तरी दिलीप स्वामी यांनी केलेल्या सुचनेनुसार केलेल्या सर्वेक्षणात जवळपास 78 हजार विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याचं लक्षात आल्यावर अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मर्यादित दहा बारा विध्यार्थ्यांसाठी कट्ट्यावर ,पारावार ,झाडाखाली शाळा भरवली जात असल्याचं जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे.

माझे मुलं माझी जबाबदारी उपक्रम

गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दिलीप स्वामी यांचा प्रयत्न आहे. या आधी स्वामी यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 0 ते 18 लाख वयोगटातील 9 लाख 77 हजाराहून अधिक विधार्थ्यांची आरोग्य तपासणी केलीय. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी माझे मुलं माझी जबाबदारी हा उपक्रम राबविला आहे. त्यानंतर शिक्षणाचा अभिनव उपक्रम सुरु केलाय ,त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांत समाधानाचं वातावरण पसरलं आहे, अशी माहिती पालक कृष्णात गाडेकर आणि शिक्षक तबसून शेख यांनी सांगितलंय.

दिलीप स्वामी यांची संकल्पना प्रत्यक्षात अमलात येईल की नाही याबाबत पालकात मोठी साशंकता होती. मात्र, त्यांच्या संकल्पनेला शिक्षक, विद्यार्थी आणि पालक भरभरून प्रतिसाद देत आहेत,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

इतर बातम्या:

शालेय फीच्या मुद्यासाठी पालक संघटना सुप्रीम कोर्टात, राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याची भावना

SSC Result 2021: दहावीचा निकाल कधी लागणार? गुण नोंदवण्याचं काम 99 टक्के पूर्ण

(Solapur ZP started schools in six hundred villages with help of Teachers under the guidance of CEO Dilip Swami)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.