SSC Result 2021: दहावीचा निकाल कधी लागणार? गुण नोंदवण्याचं काम 99 टक्के पूर्ण

SSC Result 2021: दहावीचा निकाल कधी लागणार?  गुण नोंदवण्याचं काम 99 टक्के पूर्ण
दहावी बारावी बोर्ड

राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे 99 टक्के काम पूर्ण झालं आहे.

योगेश बोरसे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 13, 2021 | 10:27 AM

SSC Result 2021 पुणे: राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आलं होतं. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत 1 जुलै रोजी संपली आहे. आतापर्यंत दहावीच्या निकालाचं कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे.

गुण नोंदवण्याचं काम अंतिम टप्प्यात

राज्यातील शाळांकडून इयत्ता दहावीच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे 99 टक्के काम पूर्ण झालं आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेली माहिती एकत्रित करून अंतिम निकाल तयार करण्यासाठी विभागीय मंडळाकडून राज्य मंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतील, अशी माहिती आहे.

दहावीचा निकाल कधी लागणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांची गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरवातीला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीच्या निकालाचं सूत्र काय?

दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील. ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील. iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

FYJC Class 11th Admission Process Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, जाणून घ्या सर्व प्रक्रिया

(Maharashtra SSC exam Result work completed within few days SSC result will declared in next week)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें