सोलापूरच्या सुकन्येचे उत्तुंग यश ! गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला

अश्विनीने गेट परीक्षेत यश मिळवत नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गेट - 2021 परीक्षेत तिला 79.67 टक्के गुण मिळाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. (Solapur's girl great success! Ranked first in the country in GATE exams)

सोलापूरच्या सुकन्येचे उत्तुंग यश ! गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला
सोलापूरच्या सुकन्येचे उत्तुंग यश
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 12:56 AM

सोलापूर : प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व तितकीच उत्तुंग ध्येयसक्ती असली कि अशक्यप्राय असलेली गोष्टही सध्या करता येते. सोलापूर जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुकन्येने हे शक्य करून दाखवले आहे. अश्विनी सहदेव कणेकर असे या सुकन्येचे नाव आहे. तिने गेट परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे तिने तिचे कुटुंब, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. तिचे सध्या समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक केले जात असून विविध संघटनांकडून पाठीवर शाबासकीची थाप दिली जात आहे. (Solapur’s girl great success! Ranked first in the country in GATE exams)

गेट – 2021 परीक्षेत तिला 79.67 टक्के गुण मिळाले

अश्विनी ही बार्शी तालुक्‍यातील गौडगावची कन्या. तसेच श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला, कृष्णानगरची ती विद्यार्थिनी आहे. तिने गेट परीक्षेत यश मिळवत नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गेट – 2021 परीक्षेत तिला 79.67 टक्के गुण मिळाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा 17 टक्के निकाल लागला आहे. यात अश्विनी कणेकरने 1000 पैकी 945 गुण मिळवत टेक्‍स्टाईल विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शालेय शिक्षण पुण्यात घेतले

गौडगाव येथे जन्मलेल्या अश्विनीने प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण पुण्यातील कृष्णानगर येथील श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या श्रीमती एस. डी. गणगे प्रशालेत पूर्ण केले. पुढे इचलकरंजीतील डीकेटी शिक्षण संस्थेत गेट परीक्षेची तयारी करीत तिने उज्ज्वल यश संपादन केले आहे. श्रीमती एस. डी. गणगे प्रशालेत अश्विनीचा तिच्या आई-वडिलांसोबत सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, प्राचार्य एच. डी. मोरे, उपप्राचार्य एस. एस. तिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि उच्च पदस्थ नोकरी मिळवून देशाची व समाजाची सेवा करायची हा विचार अश्विनीने केला आणि तिने गेट परीक्षेत देशात प्रथम येण्याचे आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले.

कोरोनानी लागण झाली, पण अश्विनी डगमगली नाही!

अश्विनी कणेकरची घरची परिस्थिती बेताचीच. याच परिस्थितीमुळे वडील सहदेव कणेकर यांनी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. मुलीचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहदेव कणेकर यांनी पूर्ण पाठिंबा दिला. अश्विनीला गेल्या वर्षी गेट परीक्षेची तयारी करीत असताना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र ती डगमगली नाही. तिने कोरोनावर यशस्वी मात केली व ती जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेली. घरी किराणा दुकानाचा व्यवसाय असल्याने अश्विनीने वेळप्रसंगी आई वंदना व वडील सहदेव कणेकर यांना दुकान चालविण्यास मदतही केली व अभ्यासातही सातत्य ठेवले. अश्विनीने 14 तास अभ्यास करीत गेट परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिचे अभ्यासातील सातत्य इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. (Solapur’s girl great success! Ranked first in the country in GATE exams)

इतर बातम्या

IAF Group C Recruitment 2021 : हवाई दलात 1500 हून अधिक पदांवर रिक्त जागा, जाणून घ्या कसा करावा अर्ज

मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्त्वे जारी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.