Sudhir Mungantiwar on Cabinet Expansion | सरकारचं खातेवाटप निश्चित मुनगंटीवारांना कोणतं खातं?

| Updated on: Aug 11, 2022 | 11:49 PM

शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे.

Follow us on

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 41 दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दोन सदस्यीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दक्षिण मुंबईतील राजभवनात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. यासह, महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता 20 झाली आहे, जी 43 सदस्यांच्या कमाल संख्याबळाच्या निम्म्याहून कमी आहे. भाजपने अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी दिली आहे. शिंदे गटानेही मंत्रिपदाची माळ जुन्या मंत्र्याच्या गळ्यात घातली. शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा आज मंत्रीमडळ विस्तार होणार आहे.