Telangana : चिंता वाढवणारी बातमी, तेलंगाणातील निवासी शाळेत 27 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग

तेलंगाणामधील (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यातील (Sangareddy) एका शाळेतील 27 विद्यार्थ्यांना कोरोना (Corona) संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

Telangana : चिंता वाढवणारी बातमी,  तेलंगाणातील निवासी शाळेत 27 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग
संग्रहित छायाचित्र.

हैदराबाद: कोरोनाचा नवा वेरिएंट ओमिक्रॉनचे (Omicron) कर्नाटकात दोन रुग्ण आढळले असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. तेलंगाणामधील (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यातील (Sangareddy) एका शाळेतील 27 विद्यार्थ्यांना कोरोना (Corona) संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दहा दिवसांमधील विद्यार्थी कोरोना संसर्गित झाल्याची ही चौथी घटना आहे. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर तेलंगाणामधील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनासंबंधी सर्व काळजी घेऊन देखील विद्यार्थी कोरोनाबाधित होत आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

250 विद्यार्थ्यांची चाचणी

तेलंगाणातील हैदराबाद जवळील संगारेड्डी जिल्ह्यातील इंद्रेशम गावातील महात्मा जोतिबा फुले निवासी शाळेतील 27 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. संगारेड्डी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार 250 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 27 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. आणखी काही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी आज करण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोना संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना घरी घेऊन जाणं पसंत केलं केलं आहे.

दहा दिवसामधील चौथी घटना

तेलंगाणामध्ये विद्यार्थी कोरोनाबाधित आढळण्याची दहा दिवसातील चौथी घटना आहे. तीन दिवसांपूर्वी संगारेड्डी जिल्ह्यातील मुतंगी विभागातील सरकारी गुरुकुल शाळेत 46 विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. तर, गेल्या आठवड्यात महिंद्रा विद्यापीठात 25 विद्यार्थी आणि 5 शिक्षकांना कोरोना संसर्ग झाल्याच समोर आलं होतं त्यानंतर विद्यापीठाचा कॅम्पस बंद करण्यात आला होता. ख्म्मम जिल्ह्यातील सरकारी शाळेतील 29 विद्यार्थ्यांना कोरोना ससंर्ग झाल्याचं देखील समोर आलं होतं. यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेलंगाणात 1 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

इतर बातम्या:

Omicron : अखेर भारतातही ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले, जगाची स्थिती काय?

महाराष्ट्राची चिंता वाढली! परदेशातून आलेल्या 485 जणांची चाचणी, 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; ओमिक्रॉनबाबत तपासणी होणार

Telangana Residential School in Sangareddy district 27 students tested corona Positive

Published On - 6:49 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI